ETV Bharat / state

कॅनडात कारच्या अपघातात चौघांचा मृत्यू; डीएनएवरुन पटली नाशिकच्या तरुणाची ओळख, कॅनडा सरकारनं नाकारला कुटुंबाचा व्हिसा

कॅनडातील कंपनीत उच्च पदावर कार्यरत तरुणाचा कारच्या भीषण अपघातात मृत्यू झाला. मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करुन हे चार तरुण परतत होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

Nashik Youth Died In Canada
दिग्विजय राजेंद्र औसरकर (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2024, 9:20 AM IST

नाशिक : कॅनडाच्या टोरंटो शहरामध्ये 24 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास नवीन टेस्ला कारचा अपघातात स्फोट होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातात नाशिकच्या इंदिरानगरमधील दिग्विजय राजेंद्र औसरकर (वय 30) या तरुणाचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिग्विजयचे वडील आणि बहीण नाशिकहुन कॅनडाला गेल्यानंतर डीएनएद्वारे दिग्विजयची ओळख पटवण्यात कॅनडा पोलिसांना यश आलं आहे. दिग्विजय हा मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून एका मोठ्या कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत होता.

Nashik Youth Died In Canada
दिग्विजय राजेंद्र औसरकर (Reporter)

दिग्विजयनं अमेरिकेतून केलं मेकॅनिकल इंजिनियर : नाशिकच्या दिग्विजय राजेंद्र औसरकर यानं अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनियरचं शिक्षण पूर्ण केलं. दिग्विजय हा अतिशय हुशार असल्यानं त्याला तेथील विद्यापीठानं ब्रँड अँबेसिडर केलं. दोन वर्षापूर्वीच त्याला कॅनडा इथं एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली. त्यामुळे नोकरीनिमित्त तो कॅनडाला स्थायिक होता. पंधरा दिवसापूर्वीच त्याची आई-वडील हे त्याला भेटून भारतात नाशिक इथं परतले. मात्र 24 ऑक्टोबरला झलक पटेल या त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यानं गुजरातचे केता गोहली, निल गोहली हे भाऊ बहिणीसह चौघंजण वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री टोरंटो शहरात एकत्र जमले. त्यांच्या एका मित्रानं नवीनच टेस्ला कार खरेदी केल्यामुळे वाढदिवस सेलिब्रेशन झाल्यानंतर हे चौघंजण टेस्ट ड्राईव्हला बाहेर पडले. यावेळी अचानकपणे एका गतिरोधकावरुन कार उलटली आणि रस्त्यालगत असलेल्या लोखंडी गल्डरवर जाऊन आदळली. याच क्षणी कारनं पेट घेत काही मिनिटातच मोठा स्फोट झाला. या अपघातात सुदैवानं बर्थडे गर्ल झलकचे प्राण वाचले. मात्र चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिग्विजय हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या दुर्घटनेमुळे औसरकर कुटुंबाला दिवाळीत मोठा आघात झाला आहे.

कॅनडा सरकारकडून मिळाली नाही अपेक्षित मदत : या दुःखाच्या प्रसंगी कॅनडा सरकारकडून नातेवाईकांना व्हिसा नाकारला गेला. सुदैवानं केवळ त्याचे वडील राजेंद्र औसरकर आणि बहीण स्वामिनी औसरकर यांचा व्हिसा हा संपला नव्हता. त्यामुळे त्यांना कॅनडाला जाता आलं. दोन देशांमधील ताणल्या गेलेल्या संबंधांचा फटका यावेळी जाणवला असं दिग्विजयचे चुलत बंधू केतन औसरकर यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Canada Accident: कॅनडामध्ये जेष्ठ नागरिकांना घेवून जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 15 ठार, 10 जखमी
  2. बसची टेम्पोला धडक, भीषण अपघातात ८ मुलासंह ११ ठार
  3. मैहरमध्ये बस-हायवा ट्रकचा भीषण अपघात; 9 प्रवाशांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी - Maihar Road Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.