ETV Bharat / state

नाशिकमध्ये खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग - Nashik Girl Molestation - NASHIK GIRL MOLESTATION

Nashik Girl Molestation : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Nashik Girl Molestation
प्रातिनिधीक चित्र (Etv Bharat file image)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 6:25 PM IST

नाशिक Nashik Girl Molestation : मुंबईतील बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खासगी क्लास घेणार्‍या शिक्षकानं पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी संशयित कृष्णा दहिभाते यास अटक केली.

वर्गात इतर मुली नसल्याचा फायदा घेतला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कृष्णा दहिभाते याचा सिडकोतील उपेंद्रनगर परिसरात ज्ञानेश्वरी क्लासेस नावाचा खासगी क्लास आहे. कृष्णा दहिभाते हा मुलांना इंग्रजी आणि विज्ञान विषय शिकवतो, तर त्याची पत्नी गणित विषय शिकवते. या क्लासमध्ये एक अल्पवयीन पीडित मुलगी गुरुवारी 22 रोजी नेहमीप्रमाणे क्लासला आली. यावेळी क्लासमध्ये इतर मुली नव्हत्या. वर्गात इतर मुली नसल्याचा फायदा घेत कृष्णा दहिभाते यानं अल्पवयीन मुलीला फळ्यावर कविता लिहिण्यास सांगितलं. कविता लिहित असताना या शिक्षकानं तिच्यासोबत अश्लील कृत्य केलं.

पीडितेला दम दिला : मुलीसोबत अश्लील कृत्य केल्यानंतर शिक्षकानं हा प्रकार घरी सांगू नको, सांगितल्यास उलट तुझीच तक्रार करेन, असा दम दिला. मुलगी क्लास संपल्यावर घरी गेली, मात्र घरी गेल्यावर ती खूप शांत आणि घाबरलेली दिसली. तिनं उद्यापासून क्लासला जाणार नसल्याचं घरी सांगितलं. त्यानंतर आईनं तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला असता, मुलीनं क्लासमध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय.

हेही वाचा

  1. धक्कादायक! निगडी येथील शाळेत शिक्षकानं केला विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकासह सात जणांना अटक - Teacher Molested School Girl
  2. अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला खाडीत! - Thane crime News
  3. शिक्षकानं विद्यार्थिनीला केले अश्लील मेसेज; अन् गुन्हा दाखल झाला मुख्याध्यापकावर - Teacher Obscene Messages To Girl

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.