नाशिक Sandalwood Smugglers Arrested : शहरात चंदन तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. चंदन तस्करानं थेट पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक विजय देशमाने यांच्या बंगल्यात घुसखोरी करत चंदनाचं झाड तोडून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत सहा संशयित आरोपीविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.
![Sandalwood Smugglers Arrested](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-08-2024/mh-nsk-chandanchor-7204957_12082024111659_1208f_1723441619_64.jpg)
पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातून चंदन चोरी : नाशिकच्या पोलीस कवायत मैदान आणि तालुका पोलीस स्टेशनच्या मधोमध पोलीस अधीक्षक विजय देशमाने यांचं शासकीय निवासस्थान आहे. अशात चंदन तस्करांनी सशस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा भेदत गोदा या पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानात प्रवेश केला. 5 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान सहा संशयितांनी लाकडी दंडके, कटर मशीन, लोखंडी रॉडसह निवासस्थानात प्रवेश करत तिथं असलेलं चंदनाचं झाडं तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संशयितांनी धूम ठोकली. मात्र चंदन तस्करांचा हा प्रयत्न फसला असला, तरी या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात सहा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं संभाजीनगरमधून दोन संशयितांना अटक केली आहे.
![Sandalwood Smugglers Arrested](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-08-2024/mh-nsk-chandanchor-7204957_12082024111659_1208f_1723441619_333.jpg)
वर्षभरापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यात चंदन चोरी : वर्षभरापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या कार्यालयाजवळच विशेष पोलीस महानिरीक्षकांचं घर आहे. याठिकाणी रात्री चोरानं बंगल्याच्या आवारात प्रवेश करत सुमारे 20 वर्ष जुन्या चंदन वृक्षाचं खोड कटरनं कापून नेलं होतं. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत सातपूर पोस्ट कार्यालयाच्या आवारातील चंदन वृक्षाची चोरी झाली. याबाबत प्रमोद आहेर यांनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाजवळून पाच चंदनाची झाडं अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
हेही वाचा :