ETV Bharat / state

Nashik Loksabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा उद्धव ठाकरे गटाला दिली; शरद पवारांचे स्पष्टीकरण - Mahavikas Aghadi

Nashik Loksabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे. नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाला दिली असून दिंडोरीतून आमचा उमेदवार निवडणूक लढवेल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

Nashik Loksabha Constituency
शरद पवारांचे स्पष्टीकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 6:03 PM IST

नाशिक Nashik Loksabha Constituency : शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेससह घटक पक्ष यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. कुणी किती जागा लढवायच्या हे ठरलं आहे. नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाला दिली असून दिंडोरीतून आमचा उमेदवार निवडणूक लढवेल. उद्धव ठाकरे सभा घेतील. मी सभा घेत आहे. वेळ मर्यादित असल्यानं आम्ही सर्व कामाला लागलो आहोत. 3 ते 4 दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागेल, असा माझा अंदाज आहे, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज (13 मार्च) नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते.

इथेनॉलबाबत केंद्राचे धोरण चुकीचे : आम्ही राज्य दौऱ्याला सुरवात केली असून लोकांचा कौल महाविकास आघाडीला दिसतोय. सत्ताधारी पक्षावर शेतकऱ्यांची नाराजी दिसते. नाशिक जिल्हा, धुळे, पुणे, सातारा या भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ऊसाच्याबाबतपण नाराजी आहे. इथेनॉलबाबत केंद्राचे धोरण चांगले नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. इतर पिकांच्या किमती पण बघितल्या तर शेतकरी अस्वस्थ दिसतोय. रोजगार नसल्यानं युवकांमध्ये अस्वस्थता आहे. त्याची किंमत सत्ताधारी पक्षाला मोजावी लागेल. आता सत्ताधारी पक्षाला सांगण्यासाठी काही नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

ईडीची कारवाई फक्त विरोधी पक्षासाठी : "केंद्र शासनाची विरोधी पक्षांवर आणि वेगळ्या पक्षांवर हल्ला करायची तयारी दिसते. ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणाचा वापर केला जातोय. कोर्टाचा निकाल सरकारच्या विरोधात जातो. ईडीच्या बाबत बघितले तर 2005 ते 2023 मध्ये दोन सरकार येऊन गेले. आमचं आणि मोदींचं सरकार येऊन 5906 ईडीच्या केसेस झाल्या. 0.5 टक्केवारी निष्कर्ष निघाला आणि संजय राऊत यांना आत टाकले. अनिल देशमुख यांच्यावरही केस झाली. सत्ताधारींकडून आरोप केले जातात. त्याच्यात काही दम नाही. 121 लोकांची मोदी सरकार आल्यावर चौकशी झाली. 115 हे विरोधी पक्षाचे आहेत. भाजपा सत्तेत आल्यावर 121 नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात 14 मंत्री, 21 खासदार, माजी आमदार, खासदार यांच्यावर कारवाई झाली. त्यात एकाही भाजपा नेत्याचा समावेश नाही. ज्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्यावर कारवाई नाही. जसे हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव वगैरे. काँग्रेस सोबत असताना कधीही अशा कारवाया झाल्या नाही. आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही. निवडणुकीच्या निमित्तानं सत्तेचा गैरवापर केला जातोय. ईडी फक्त विरोधी पक्षासाठी वापरली जाते", असा आरोप शरद पवार यांनी केला.

शरद पवार गटाकडून भगरेंना उमेदवारीची शक्यता : दिंडोरी मतदारसंघात शरद पवार गटाकडून भगरे उमेदवार असतील? दिंडोरी मतदार संघात भाजपाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार विद्यमान खासदार आहेत. अशात शरद पवार गटाकडून दिंडोरीच्या जागेसाठी माजी जि. प. सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोर भास्कर भगरे यांचं आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज भारती पवार यांच्या मतदारसंघातील निफाड तालुक्यात शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेत शरद पवार भास्कर भगरेंच्या नावाची घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi : तरुणांना बेरोजगार ठेऊन मोदी सरकारने देशाची संपत्ती उद्योगपतींच्या घशात घातली - राहुल गांधी
  2. Arvind Kejriwal on CAA: पाकिस्तानमधील जनतेसाठी भारताचा पैसा वापरण्यात येणार, सीएएवरून केजरीवाल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
  3. PM Narendra Modi : 'भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश'; सेमी कंडक्टर प्रकल्पांची पंतप्रधान मोदींनी केली पायाभरणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.