ETV Bharat / state

कुंपणच खाते शेत! पोलीस अकादमीतील महिला पोलिसावर बलात्कार, 'असे' प्रकरण आले उजेडात - Maharashtra Police Academy News

Nashik Crime News महाराष्ट्र पोलीस अकादमीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. याच ठिकाणी अशी घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 9:11 AM IST

Maharashtra Police Academy
महाराष्ट्र पोलीस अकादमी (ETV Bharat)

नाशिक Nashik Crime News: नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतील रहिवासी वसाहतीमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस अकादमीची बदनामी होवू नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरण दळपण्याचा प्रयत्न केला परंतु एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यानं पीडित महिलेला साथ देत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हे प्रकरण समोर आलं. या संदर्भात पीडित महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीनं महिलेचा व्हिडिओदेखील काढल्याचं पीडित महिलेचं म्हणणं आहे.

नेमकं काय घडलं: मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस अकादमीत स्वच्छेतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून बलात्कार करण्यात आला असल्याची माहिती आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारीच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमित नामक संशयिताला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली जात आहे. संशयित आरोपी आणि पीडित पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचंदेखील सांगितलं जातयं. आरोपीसोबत पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे वाद झालं. त्यानंतर संबंधित आरोपीनं महाराष्ट्र पोलीस अकादमीतील घरामध्ये पीडितेवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीनं महिलेला रात्रभर मारहाण केली. इतकच नव्हे तर बलात्कार करतानाचा व्हिडिओदेखील काढला असल्याचं पीडितेचं म्हणणे आहे. घटनेनंतर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत संशयिताविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल: संशयित आरोपीनं पीडित महिला पोलिस कर्मचाऱ्याला रात्रभर मारहाण केली. तसंच बलात्कार करत व्हिडिओदेखील काढला. अशात पोलीस अकादमीची बदनामी होऊ नये, यासाठी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करू नये, असं या महिलेला सांगितलं होतं. मात्र, एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यानं पीडित महिलेला साथ देत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत संशयिता विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. पीडित महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

  1. भिक्षा मागणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Thane Crime News
  2. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी; आरोपीला २० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा - Thane Crime News
  3. सातारा जिल्ह्यातील दरोडा; जबरी चोरीचे २६ गुन्हे उघड, दोन चोरट्यांकडून केले ५४ तोळ्याचे दागिने हस्तगत - Satara Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.