ETV Bharat / state

थंडी वाढली! लाडू बनवताना गृहिणींचं बजेट कोलमडणार; सुकामेव्याच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ - DRY FRUIT PRICE INCREASED

थंडीच्या प्रमाणात वाढ होऊ लागल्यानं आरोग्यवर्धन सुकामेव्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळं थंडीच्या दिवसांत लाडू बनवताना गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे.

Nashik budget for winter laddus increased, dry fruit price increased by rs 100 to 150 per kg
सुकामेव्याच्या दरात वाढ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

नाशिक : नाशिक शहरामध्ये मागील आठ दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्याचा पारा 10 अंशापर्यंत घसरल्यानं आबालवृद्धांना उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडावं लागतंय. थंडीच्या दिवसांत शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. त्यामुळं घरोघरी सुकामेव्याचे लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा सुकामेव्याचे भाव प्रति किलो 100 ते 150 रुपयांनी वाढले आहेत. तसंच शुद्ध देशी तुपाच्या भावात देखील वाढ झालीय. त्यामुळं थंडीसाठी बनवल्या जाणाऱ्या लाडूंसाठी गृहिणींना महागाईचा सामना करावा लागत असल्यानं त्यांचं आर्थिक बजेट काहीसं कोलमडलं आहे.

दर वाढले तरी मागणी चांगली : आरोग्यासाठी हिवाळा अधिक पोषक मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळं शरीराचा 'पोषणकाळ' म्हणून हिवाळ्याकडं बघितलं जातं. अशातच थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उष्म पदार्थांचं सेवन केलं जातं. शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचं सेवन केल्यानं पोषणासह त्वचेसाठीही मदत होते, असा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जात असतो. त्यामुळे घरोघरी पौष्टिक लाडूंसाठी सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, यंदा गतवर्षी पेक्षा सर्वच सुकामेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अशात दर वाढले असले, तरी सुकामेव्याला चांगली मागणी असल्याची माहिती सुकामेवा व्यापारी सरिता शाह यांनी दिली.

नाशिकमध्ये सुकामेव्याच्या दरात वाढ (ETV Bharat Reporter)

सुकामेव्याचे दर खालीलप्रमाणे (प्रति किलो) :
बदाम 600 ते 750
काजू 800 ते 1000
आक्रोड 1100 ते 1400
गोडंबी 800 ते 1400
पिवळी खारीक 200 ते 250
काळी खारीक 300 ते 500
खोबरे 150 ते 240
अंजीर 1000 ते 1400

सुकामेव्याच्या लाडवाची रेसिपी : थंडीत सुकामेव्याचे लाडू बनवण्यावर भर दिला जातो. या लाडवांमध्ये मेथी, डिंकाबरोबरच सुकामेव्यातील खारीक, खोबरे, आक्रोड, गोडंबी, जायफळ, गुळ, काजू, बदाम, पिस्ता, तूप, आवडीनुसार गव्हाचं पीठ मिसळण्यात येतं. मेथीची पीठ गायीच्या तुपात भाजून दोन ते तीन दिवस झाकून ठेवावी. त्यानंतर खोबऱ्याचा कीस तयार करुन त्याला हलकेसे तव्यावर भाजून घ्यावं. त्यानंतर सुकामेव्याचे बारीक तुकडे नाहीतर पूड करुन पीठात टाकावी. ड‌िंक तुपात तळून घेतल्यावर तोही बारीक करुन घ्यावा. गुळाला तुपात विरघळून घेतल्यावर पीठाच्या मिश्रणात ढवळावं आणि काही वेळात लाडू वळावे, झाले तयार थंडीचे पौष्टिक लाडू!

हेही वाचा -

  1. Benefits of Dry Fruits :हिवाळ्यात बनवा 'ड्राय फ्रुट्सचे हेल्दी लाडू', जाणून घ्या रेसिपी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.