ETV Bharat / state

नरेश म्हस्केंच्या विजयामुळं 'राजन' यांच्यावर विचार करण्याची वेळ, काय आहेत पराभवाची कारणं? - Naresh Mhaske victory in Thane Lok Sabha

Thane Lok Sabha Result : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात आपला बालेकिल्ला राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलय. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांनी विजयी मिळवलाय. तर दुसरीकडं राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या पराभवाची कारणं समोर येत आहेत.

Naresh Mhaske victory in Thane
नरेश म्हस्के, राजन विचारे (ETV BHARAT Maharashtra Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 6:47 PM IST

ठाणे Thane Lok Sabha Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात राजन विचारे यांची दोन टर्मची खासदारकी काल संपुष्टात आली. विचारे यांचा पराभव होण्यामागं विविध कारणं समोर येत आहेत. त्यात कार्यकर्त्यांची कमतरता, नागरिकांशी संपर्काचा अभाव, विकास कामाना जनतेपर्यंत पोहचवण्यात अपयश, अशा कारणांचा समावेश आहे.

संपर्क नसल्यानं विचारेंचा पराभव : राजन विचारे यांचा नागरिकांशी संपर्क नसल्यामुळं त्याचा पराभव झाल्याची चर्चा आहे. तसंच त्यांना फोन केल्यानंतही ते फोनवर उपलब्ध होत नव्हते. त्यामुळं नागरिकांनी त्यांना फोन करणं बंद केलं होतं. राजन विचारे जनसंपर्क साधण्यात तरबेज नसल्यामुळं त्यांचा पराभव झाला असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

निवडणुका लढण्याची रणनीती : दुसरीकडं या निवडणुकीत विजयी झालेले नरेश म्हस्के यांनी अवघ्या काही दिवसातच मेहनत घेऊन विजय मिळवलाय. त्यांच्या विजयामागं देखील अनेक सहकाऱ्यांचा हात असल्याचं ते स्वतः सांगत आहेत. या निवडणुकीत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर, संघटनेचा वर्षानुवर्ष असलेला अनुभव, निवडणुका लढण्याची रणनीती, अशा कारणामुळं त्यांना विजय मिळवण्यात यश आलंय. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जातीनं लक्ष देऊन ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. नरेश म्हस्के यांना भाजपाची मिळालेली मदत, मनसेचा पाठिंबा असल्यामुळं म्हस्के यांचा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय.

नाराजी संपवली : नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटामध्येच काही प्रमाणात नाराजी होती. ही नाराजी कमी करण्यासाठी स्वतः नरेश म्हस्के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हे देखील प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस यांची देखील मदत घेऊन भाजपामधली नाराजी मिटवण्याचा प्रयत्न नरेश म्हस्के यांनी केला. सहा विधानसभांपैकी चार विधानसभा ह्या भाजपाकडं असताना देखील शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवत नरेश म्हस्के यांनी विजय मिळवला.

प्रताप सरनाईक, रवींद्र पाठक यांची मदत : ओवळा-माजिवडा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक यांनी सुरुवातीपासूनच नरेश मस्के यांना सर्वतोपरी मदत केली. त्यामुळं या मतदारसंघातून नरेश मस्के यांना मोठ्या प्रमाणात मतदान देखील झालं. ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर निरंजन डावखरे या भाजपाच्या आमदारांनी नगरसेवकांसोबत मिळून महायुतीसाठी प्रयत्न करत नरेश मस्के यांना मतदान करून घेतलं.

नरेश म्हस्के वरचढ : मागील दहा वर्षात राजन विचारे यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले. मात्र, हे प्रकल्प मार्गी लावल्यानंतर त्या कामाचं श्रेय घेण्यामध्ये कुठेतरी राजन विचार कमी पडले. त्यामुळंच नरेश म्हस्के या निवडणुकीत वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं.

हे वाचलंत का :

  1. भुमरेंनी खैरेंना दाखवला चंद्र, मराठा आंदोलनामुळं बदललं समीकरण - Aurangabad Lok Sabha Result 2024
  2. नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता; आज दिल्लीत ठरणार रणनीती - Lok Sabha Election Result 2024
  3. लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी; आजच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत रणनीती ठरवणार : शरद पवारांचा मोठा दावा - Sharad Pawar Press Conference

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.