मुंबई NCB seized Drugs : अंमली पदार्थ नियंत्रण पथक मुंबईनं आंतरराज्यीय ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड केलाय. या कारवाईत 169.7 किलो कोडीन सिरप, अल्प्राझोलमच्या 22 हजार गोळ्या आणि नायट्राझेपामच्या 10 हजार 380 गोळ्या जप्त केल्या असून वाहनासह एकास अटक करण्यात आली असल्याची माहिती एनसीबीचे ॲडिशनल डायरेक्टर अमित घवटे यांनी दिलीय. या कारवाईत 169.7 किलो कोडीन सिरप आणि 12,400 अल्प्राझोलम गोळ्या पनवेल, रायगड येथील स्टोरेज ठिकाणाहून जप्त करण्यात आलीय. वाहतूक वाहनासह एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. घरोघरी झडती घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथून 9 हजार 600 अल्प्राझोलम गोळ्या आणि 10 हजार 380 नायट्राझेपम गोळ्या जप्त करण्यात आल्या.
अंतर्देशीय पार्सलद्वारे इतर राज्यांतून अवैधरीत्या आणलेले ड्रग्ज : वाढीव सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर इनपुट गोळा केले गेले आणि ज्यात ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थित सिंडिकेट अवैधरित्या वळवलेल्या फार्मास्युटिकल औषधांच्या खरेदीमध्ये आणि पुढं मुंबई आणि MMR मध्ये खेप वितरीत करण्यात सक्रियपणे सहभागी होत असल्याचं उघडकीस आलंय. त्यानुसार, सखोल फील्ड इंटेलिजन्स आणि विश्लेषणामुळं इतर राज्यांमधून बेकायदेशीर फार्मा औषधांच्या मोठ्या प्रमाणात खरेदीमध्ये गुंतलेल्या काही व्यक्तींची ओळख पटली. नंतर तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर, एक कुरिअर लाइनची ओळख पटली गेली आणि त्याचा वाहतुकीच्या उद्देशानं गैरवापर केला जात होता. हळूहळू, पनवेल, रायगडमध्ये खरेदी केलेली ड्रग्ज सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्टोरेज ठिकाण नेमलं गेलं. एनसीबीनं केलेल्या प्रयत्नांच्या आधारे, माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात ड्रग्जची मोठ्या प्रमाणात खेप स्टोरेज ठिकाणी वितरित केली जाणार होती.
सापळा रचत आरोपीला घेतलं ताब्यात : यानंतर 4 मे रोजी, स्टोरेज लोकेशन एरियावर सक्रीय पाळत ठेवण्यात आली होती आणि पार्सल त्या ठिकाणी वितरित केल्याची माहिती देण्यात आली होती. एनसीबी मुंबई टीमनं चोख पाळत ठेवली आणि टी एम शफी नावाच्या संशयित व्यक्तीवर पाळत ठेवली. नंतर, टी.एम. शफी माल घेण्यासाठी कारमधून परिसरात आला. त्यानंतर, टी एम शफीला एनसीबी-मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि परिसराची झडती घेतली असता एकूण 169.7 किलो वजनाचं कोडीन सिरप आणि अल्प्राझोलमच्या 12 हजार 400 गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळं घटनास्थळी चौकशी करुन टी एम शफीनं मुंब्रा जिल्हा-ठाणे इथं आणखी एका खेपेबाबत माहिती उघडकीस आणली. तत्काळ एनसीबी-मुंबईचं पथक या भागात रवाना झालं. ओळख पटल्यावर, परिसराची झडती घेण्यात आली. ज्यामुळं अल्प्राझोलमच्या 9 हजार 600 गोळ्या आणि नायट्राझेपमच्या 10 हजार 380 गोळ्या जप्त करण्यात आल्या. टी एम शफीची पुढील चौकशी करण्यात आलीय. ज्यात दोषी असल्याचं उघसकीस आलंय. शफीची सध्या चौकशी सुरु असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा :