मुंबई Disposed 982 kg drugs : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तब्बल ९८२ किलो ड्रग्जची विल्हेवाट लावली आहे. वेगवेगळ्या तब्बल 95 केसेस मध्ये जप्त करण्यात आलेलं एमडी, गांजा, चरस, हेरॉईन अशा अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती एनसीबीचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी दिली आहे.
विविध प्रकारचे अमली पदार्थ - ९८२ किलो अमली पदार्थ भस्मसात करण्यात आले आहे. मेफेड्रॉन, कोकेन, MDMA, गांजा, चरस, हेरॉईन, तसंच इतर काही कृत्रिम अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. एनसीबीने आंतरराष्ट्रीय तसंच आंतरराज्यय अमली पदार्थ तस्करांवर केलेल्या कारवाईत जप्त केलेले हे अमली पदार्थ होते. ते नष्ट करण्यात आले आहेत.
२० किलो मेफेड्रॉन - नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये जून २०२३ मध्ये डोंगरी परिसरातून जप्त करण्यात आलेल्या २० किलो मेफेड्रॉनचा देखील समावेश आहे. या कारवाईत किंगपिन, फायनान्सर, प्रमुख सहकारी यासह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेक आरोपींना अटक करण्यात आली आणि कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आली.
अवैध ड्रग्जची विल्हेवाट - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई झोनल युनिटने जप्त केलेल्या सुमारे 982.100 किलो अवैध ड्रग्जची विल्हेवाट लावली आहे. विविध प्रकरणांमध्ये अवैध ड्रग्ज मिळालं होतं. तपासादरम्यान परदेशी नागरिकांसह अनेक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार एक नियमित अमली पदार्थ विल्हेवाट समिती (RDDC) स्थापन करण्यात आली होती. सर्व कायदेशीर अटींची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर जप्त केलेले ड्रग्ज 12 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. मध्येच जाळून टाकण्यात आले.
आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेट - विल्हेवाट लावलेल्या ड्रग्समध्ये गांजा, मेफेड्रोन, इफेड्रिन, CBCS, नायट्राझेपम गोळ्या, हेरॉइन, कोकेन, MDMA/एक्सटसी, मेथॅम्फेटामाइन, चरस, अफू, झोलपीडेम, अल्प्राझोलम आणि ट्रामाडोल यांचा समावेश आहे. हे अनेक आंतरराष्ट्रीय तसेच आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटमधून हे सगळे पदार्थ जप्त करण्यात आले होते. या कारवाईत परदेशी नागरिकांसह असंख्य व्यक्तींना अटक करण्यात आली होती.