ETV Bharat / state

श्री संत तुकाराम महाराज पालखीत चौघडा गाडी ओढण्याची परंपरा यंदाही कायम; टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या-संद्या जोडीला मान - Tukaram Maharaj Palkhi Dehu Alandi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 4:31 PM IST

Tukaram Maharaj Palkhi Dehu Alandi : आषाढी एकादशी निमित्त संत तुकाराम महाराजांच्या पालखीत चौघडा गाडी ओढण्याची परंपरा आहे. यंदाचा हा मान टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मानेकर यांच्या बैलजोडीला मिळालाय. याकरता संस्थानतर्फे २६ बैलजोडीतून शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी आणि एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

Tukaram Maharaj Palkhi Dehu Alandi
नंद्या व संद्याच्या जोडीला घेऊन जाताना बैलमालक (ETV BHARAT REPORTER)

देहू आळंदी (पुणे) Tukaram Maharaj Palkhi Dehu Alandi : जगद्‌गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची आणि सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा आणि राजा तसंच नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार आणि गुलाब या बैलजोडीला मिळाली आहे. तर चौघडा गाडी ओढण्याचा मान टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या आणि संद्या जोडीला मिळाला आहे.

तुकाराम महाराजांच्या पालखीतील चौघडा ओढण्यासाठी सजलेली बैलजोडी (ETVBharat Reporter)

भक्कम अशा बैलजोडीची निवड : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीनं पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैलजोड्या पालखी रथासाठी आणि एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा पालखी सोहळा प्रमुख तथा संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी ही निवड केली. माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीसाठी अर्ज : सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा आणि राजा आहे. त्याचप्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार-गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. चिखली टाळगावमधील नंद्या, संद्याला मानपालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.

यामुळे मळेकर कुटुंबीय आनंदी : यंदा चौघडा गाडीओढण्यासाठी सात ते आठ बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते. त्यात मळेकर यांची बैलजोडी शारीरिक, वैद्यकीयदृष्ट्या भक्कम असल्यानं त्यांना हा मान मिळालाय. या बैलजोडीची निवड करताना बैलांची शिंगे, उंची, डोळे, पायाची खुरे, चालण्याची ऐट सर्व काही बाबी तपासल्या गेल्या. नंतरच या बैलजोडीची निवड करण्यात आली आहे. गेली दहा वर्षे प्रयत्न करत असताना संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सेवा देण्याचा यंदाचा बहुमान मळेकर कुटुंबीयांना मिळाल्यानंतर ह्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. मळेकर कुटुंबीयांच्यावतीनं या बैलजोडीचा कसून सराव घेतला जात आहे. त्यांना गर्दीच्या ठिकाणीसुद्धा घेऊन जाण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची, खाण्या-पिण्याची देखील योग्य निगा हे मळेकर कुटुंब घेत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे चौघडागाडी ओढण्याचा मान आम्हाला मिळणं आमचं भाग्य असल्याचं मळेकर कुटुंबीय म्हणतायत.

प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी सुविधा : देहू संस्थानच्यावतीनं पालखी सोहळ्यासाठी तयारी सुरू आहे. देहू नगरपरिषदेच्यावतीनं विविध कामे सुरू आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नुकतीच देहू येथे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तयारी सुरू आहे.

हेही वाचा :

  1. सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड, जाणून घ्या त्यांची राजकीय कारकीर्द - Om Birla elected as Speaker
  2. दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक - Arvind Kejriwal Arrest By CBI
  3. महाविद्यालय प्रशासनानं घातलेली बुरखाबंदी योग्यच; मुंबई उच्च न्यायालयानं 9 विद्यार्थिनींची याचिका फेटाळली - Mumbai Hijab Controversy

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.