नांदेड Nanded MP Vasant Chavan Passed Away : नांदेडचे काँग्रेस खासदर वसंत चव्हाण (Vasantrao Chavan) यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबाद येथील किम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज पहाटे 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 26, 2024
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला.
वसंतरावजी चव्हाण… pic.twitter.com/DTGRe8p5hm
हैदराबादमध्ये सुरू होते उपचार : खासदार वसंत चव्हाण यांना गेल्या काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळं त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानं पुढील उपचारासाठी हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनामुळं नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 26, 2024
काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर… pic.twitter.com/VQ3W4sdZpF
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतराव चव्हाण यांना जड अंतःकरणानं श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती. काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेनं ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे.- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देऊन आज ना उद्या ते बरे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आज पहाटे काळाने त्यांच्यावर घाला घातला.खासदार वसंतराव चव्हाण व आमचे दोन पिढ्यांचे संबंध होते. आमच्या वडिलांनी एकत्र काम केले, आम्हीसुद्धा राजकारण व सहकार क्षेत्रात अनेक वर्ष सोबत राहिलो. नांदेडचे खासदार म्हणून त्यांना प्रथमच केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी लाभली होती. मात्र, त्यांच्या निधनाने ग्रामीण भागाची नाडी उत्तमपणे जाणणारे एक संयमी, विनम्र व अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं. - अशोक चव्हाण, राज्यसभा खासदार, भाजपा
नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी - SCP
ज्येष्ठ नेते व नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देऊन आज ना उद्या ते बरे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आज पहाटे काळाने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला.
— Ashok Chavan (@AshokChavan1958) August 26, 2024
खा. वसंतराव चव्हाण व आमचे दोन पिढ्यांचे संबंध होते. आमच्या… pic.twitter.com/wvcBIn0ou2
काँग्रेसचा ज्येष्ठ नेता हरपला : प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला वसंतराव चव्हाण यांना डायलिसिस करावी लागत होती. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळं त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणं शक्य झालं नाही. त्यामुळं त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याची माहिती समोर आली
नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे.… pic.twitter.com/0vX1DGaLDG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 26, 2024
निवडणुकीत भाजपा उमेदवाराला चारली होती थूळ : अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. लोकसभा 2024 निवडणुकीत भाजपाकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली होती तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांच्या पाठिंब्यामुळं भाजपा नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपाच्या प्रताप चिखलीकरांचा पराभव केला.