मुंबई Nana Patole : कॉंग्रेसच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना लाखो लोकांसोबत मुंबईत यावं लागलं याला शिंदे-भाजपचे सरकार जबाबदार आहे. (Congress Republic Day) या सरकारचं हे पाप आहे. मुंबईत येण्यापासून मनोज जरांगे पाटील यांना रोखणार नाही, असं सरकारनं यापूर्वी उच्च न्यायालयात सांगितलं आहे. आरक्षण देणारच अशी भूमिका शिंदे-भाजप सरकारने जाहीर करून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्या; (Politics) मग अजून आरक्षण का दिले जात नाही आहे. सरकार फक्त बनवाबनवी करत असल्यानं आज मराठा समाजात तीव्र संताप आहे, म्हणूनच त्यांना मुंबईत यावं लागलं. (Maharashtra Politics)
आरक्षण देण्यामध्ये कोणती अडचण आहे? नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा सरकारकडे राज्यात आणि केंद्रात पाशवी बहुमत असताना आरक्षण देण्यामध्ये कोणती अडचण आहे? भाजपा सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील मराठा, ओबीसी, धनगर समाजाची चेष्टा करत आहे. जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर तुम्ही खुर्ची खाली करा, आम्ही आरक्षण देऊ असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, त्यांच्या केसालासुद्धा धक्का लावाल तर याद राखा. सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारासुद्धा नाना पटोले यांनी याप्रसंगी दिला आहे.
धर्मांध शक्तीचं सरकार खाली खेचणं गरजेचं: नाना पटोले बोलले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भिती व्यक्त केली होती ती आज खरी ठरत आहे. कारण ते दूरदृष्टीचे नेते होते. देशात आज सर्वत्र जाती-धर्माच्या नावानं भांडणे लावली जात असून विविध भाषा, जाती, धर्म, संस्कृतीचे लोक या देशात गुण्यागोविंदाने राहत असताना देश तोडण्याचं काम केलं जात आहे. ओबीसी, एससी, एसटी, आदिवासी यांचे अधिकार कमी केले जात असून गांधी-नेहरुंचा विचार संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत.
स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा संकल्प: पुण्यात महात्मा गांधी यांच्यावर आयोजित करण्यात आलेली निबंध स्पर्धा होऊ नये यासाठी सरकारने खूप प्रयत्न केले. येणाऱ्या नवीन पिढीला राष्ट्रपिता महात्मा गांधी समजू नयेत यासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे. पण आजची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. ‘करो या मरो’ चा मंत्र महात्मा गांधी यांनी दिला होता. देशातून धर्मांध शक्तीचे सरकार खाली खेचणे कोणत्याही परिस्थितीत गरजेचं असल्याचं सांगत राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या माध्यमातून संपूर्ण देश जोडण्याचे काम करत आहेत. आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. यामुळे देशाचे स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही अबाधित ठेवण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.
हेही वाचा: