ETV Bharat / state

नाना पटोले होणार भावी मुख्यमंत्री? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा भाऊ - Nana Patole CM Post Race

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 7:37 PM IST

Nana Patole CM Post Race : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?, अशी चर्चा सुरू असताना आता या शर्यतीत नाना पटोले यांनीही उडी घेतली आहे. सध्या काँग्रेस राज्यात महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी यांनी सांगितलं. त्यामुळं आगामी निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व राहिल्यास काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे.

Nana Patole
नाना पटोले (Etv Bharat MH Desk)

मुंबई Nana Patole CM Post Race : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी तसंच महायुतीनं प्रचाराची तयारी सुरू केलीय. राज्य सरकारनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजना फसव्या असल्याचा प्रचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असा सवाल महायुतीकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलं नाहीय. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या शर्यतीत उतरल्याचं पाहायला मिळतय.

काँग्रेस मोठा भाऊ : 'या' संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी म्हणाले की, पंढरपूरमध्ये काही भाविकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री, अशी लिहिलेली वीणा घातली. त्यानंतर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त करताना नशिबात असेल, ते होईल असं म्हटलं. त्याचं कारण सध्या काँग्रेस राज्यात मोठा पक्ष आहे. आमच्याकडं सदतीस आमदार आहेत, तर तेरा खासदार निवडून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही, आमच्या पक्षाला अशाच पद्धतीनं यश मिळालं. जनतेचा प्रतिसाद मिळाला, तर निश्चितच काँग्रेस मोठा भाऊ होऊ शकतो. त्यामुळं काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करणं, गैर नसल्याचंही ते म्हणाले.

योग्य वेळी, योग्य निर्णय : या संदर्भात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते तुषार रसाळ म्हणाले, विधानसभा निवडणुकानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तोपर्यंत महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न, समस्या याकडंच आम्ही लक्ष देत आहोत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, यावर उद्धव ठाकरे यांनीच 'महाराष्ट्रातील जनता' असं यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे, पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, हे वारंवार सिद्ध झालं आहे. संजय राऊत यांनीही या संदर्भात सूतोवाच केलं आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्यक्षात महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला, नसला तरी प्रत्येक पक्षाला अपेक्षा असणं गैर नाही. शेवटी निर्णय जनतेच्या हातात आहे, असंही ते म्हणाले.

भावना व्यक्त करण्यात काही गैर काय : या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, पटोले यांच्या चाहत्यांनी भावना व्यक्त करण्यात काही गैर नाही. मात्र संसदीय लोकशाही पद्धतीत मुख्यमंत्री पदाचा किंवा सरपंच पदाचा चेहरा आधी जाहीर करून निवडणूक लढवण्याची पद्धत नाही. महाविकास आघाडी संसदीय लोकशाही प्रमाणे वागते. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही. निवडून आलेले आमदार आपला नेता निवडतील. त्यामुळं आमच्यासाठी हा प्रश्नच नाही, असंही लवांडे म्हणाले.

'हे' वाचलंत का :

  1. "धर्मापेक्षा कोणीही मोठा नाही"; उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा महंत नारायण गिरींचा आरोप - Mahant Giri On Uddhav Thackeray
  2. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा- ओबीसी संघर्षातून ध्रुवीकरण - Maratha VS OBC Reservation
  3. 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.