ETV Bharat / state

सीमा शुल्क विभागाचा तस्करांना दणका; तब्बल १९ कोटीचे अमली पदार्थ नष्ट - NAGPUR CRIME

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 11:27 AM IST

Nagpur Crime : अमली पदार्थ विरोधात कारवाई करत केंद्रीय सीमा शुल्क विभागानं तब्बल १९ कोटी ७ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले आहेत. एनडीपीएसचे सीमा शुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Nagpur Crime
१९ कोटी किमतीचे अमली पदार्थ नष्ट (ETV Bharat Reporter)

नागपूर Nagpur Crime: केंद्रीय सीमा शुल्क विभागानं तब्बल १९ कोटी ७ लाख रुपये इतक्या किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले आहेत. कस्टमच्या नागपूर पथकानं हे अमली पदार्थ दोन कारवाई दरम्यान जप्त केले होते. सर्व मुद्देमाल नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमईपीएल कंपनीत जाळून नष्ट करण्यात आला आहे. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थामध्ये १ किलो ७ ग्राम कोकेन तर १ हजार ३३९ किलो गांजाचा समावेश होता.

सीमा शुल्क विभागाचा तस्करांना दणका : एनडीपीएसचे सीमा शुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रग डिस्पोजल समिती, सीमाशुल्क नागपूरचे अध्यक्ष पीयूष भाटी आणि सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अमली पदार्थविरुद्ध झिओ टॉलरंसची भूमिका केंद्रीय सीमा शुल्क विभागाची असून तस्करांना धडा शिकवण्यासाठी अमली पदार्थ जप्त करुन ते नष्ट करण्यात आले आहेत.

हेही वाचा

  1. शारजावरून नागपूरला विमानाने आलेल्या दोन प्रवाशांकडून २०० ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांसह २० मोबाईल जप्त - Gold Smuggling Case Nagpur
  2. लाच मागितल्याप्रकरणी सहायक वस्त्रोद्योग आयुक्तांना अटक
  3. नागपूरमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या कृत्रिम पायाद्वारे ड्रग्सची तस्करी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.