ETV Bharat / state

नागपुरात घडले दुहेरी हत्याकांड, काही तासातच आरोपींना बेड्या - Nagpur crime

Double murder in Nagpur city : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबी परिसरात दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकणातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Double murder in Nagpur city
आर्थिक वादातून दोन जणांची हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 10:42 PM IST

विश्वनाथ चव्हाण यांची प्रतिक्रिया

नागपूर Double murder in Nagpur city : नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारताच अवघ्या 12 तासात नागपूर शहरमध्ये दुहेरी हत्याकांड घडलं आहे. पूर्व नागपुरातील वाठोडा खरबी परिसरात आर्थिक वादातून एका टोळक्यानं भरदिवसा दोन जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कृष्णकांत भट, सनी सरुडकर अशी मृतांची नावं आहेत.

मित्रानंच केली हत्या : आज सकाळी हे दुहेरी हत्याकांड उघड झालय. दोन्ही मृतक तसंच आरोपी मित्र असल्याची माहिती पुढं आली आहे. मृतक सनी तसंच किरणमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर या वादाचं रूपांतर हत्याकांडात झालं आहे. हे दोघेही आरोपी किरण शेंडेचे मित्र असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिली. सनीन किरणला ईएमआयवर वाहन खरेदीसाठी मदत केली होती. तथापि, किरण ईएमआय भरण्यात अयशस्वी झाल्यामुळं, सनीला फायनान्स कंपन्यांकडून कॉल येत होते. त्यामुळं खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपी किरणनं त्यांच्यावर दगड, काठ्यांनी हल्ला केला. त्यामुळं दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना चार तासात अटक : ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खरबी परिसरात घडली. आर्थिक वादातून ही दुहेरी हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी किरण शिंदेसह यातील सर्व आरोपींना वाठोडा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाणे वाठोडा येथे आरोपींविरूध्द कलम 302, 34 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 'परिमंडळ चार'चे पोलीस उपायुक्त तसंच सि.आय.यु. पथकाचं अधिकाऱ्यांनी सदर गुन्हयातील आरोपींचं नाव निष्पन्न केलं. किरण शेषराव शेंडे, योगेश शेषराव शेंडे, विकास उर्फ विक्की राजकुमार कोहरे यांच्याहसह एक विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग आढळून आला आहे. पोलिसांनी काही तासातचं सर्व आरोपींना अटक करत पुढील तपास सुरू केला.

कर्जाचे हफ्ते फेडत नसल्यानं वाद : सनी धनंजय सरूडकर यांच्या नावावर आरोपी किरण शेंडेनं मोटरसायकल हफ्त्यानं खरेदी केली होती. परंतु त्याच्याकडं हफ्ते भरण्याचे पैसे नसल्याने त्यांनी सनीकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे परत मागण्याकरीता सनी सरूडकर, कृष्णकांत उर्फ कुन्नू भट आरोपीच्या घरी गेले होते. याच कारणावरून आरोपीनं भाऊ तसंच दोन साथिदारांशी संगनमत करून किरण शेंडेची हत्या केली.

हे वाचलंत का :

  1. शिवा वझरकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी स्वप्नील काशीकरच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा जप्त
  2. प्रेम प्रकरणात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं केला खून; अमरावतीत नेमकं काय घडलं?
  3. चेंबूर आणि भाईंदर परिसरात सिलेंडरचा स्फोट; 10 जण गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.