ETV Bharat / state

एकनाथ शिंदेंसोबत आपला प्रासंगिक करार; कल्याण काळेंच्या जाहीर सत्कारात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं खळबळ - Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale - ABDUL SATTAR FELICITATED TO KALYAN KALE

Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale : महायुतीचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत विजयानंतर कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी बोलताना मी काम रावसाहेब दानवे यांचं केला, मात्र माझ्या मनात कल्याण काळे होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपला प्रासंगिक करार झालेला आहे. त्यामुळे ज्या दिवशी त्यांचा विश्वास उडेल, मी बाहेर पडेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 11:10 AM IST

छत्रपती संभाजीनगर Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale : शिवसेना फुटल्यानंतर भाषणबाजी करणारे अब्दुल सत्तार आता पुन्हा काँग्रेस वासी होतील का? असा प्रश्न निर्माण झालाय. जालना लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे विजयी उमेदवार डॉ कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार अब्दुल सत्तार यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार झाला असून त्यांचा माझ्यावरचा विश्वास कमी झाल्यास मी बाहेर पडेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. "भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं काम केलं, मात्र मनात कल्याण काळे कायम होते," असं विधान करत अब्दुल सत्तार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे संकेत दिले, त्यामुळे पुन्हा एकदा अब्दुल सत्तार चर्चेत आले.

Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale
कल्याण काळेंचा सत्कार करताना अब्दुल सत्तार (ETV Bharat)

विजयी उमेदवार कल्याण काळे यांचा सत्कार : चार जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. त्यात जालना लोकसभा मतदार संघात तब्बल 35 वर्षांनी काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळाला. डॉ कल्याण काळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर महायुतीचे घटक असलेले आमदार आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. इतकंच काय तर काम रावसाहेब दानवे यांचं केलं, मात्र मनात कल्याण काळे होते, असं वक्तव्य त्यांनी केलं. "सिल्लोड मतदार संघात भाजपाला कमी मतदान झाले, असा आरोप केला जातोय. मात्र रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदार संघात देखील त्यांना कमी मतदान झालं," असं आमदार सत्तार यांनी सांगत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधी भूमिका घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.

एकनाथ शिंदे यांच्या सोबत प्रासंगिक करार : डॉ कल्याण काळे यांच्या विजयानंतर एकेकाळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेले आणि नंतर एकत्र आलेल्या सत्तार यांनी पुन्हा एकदा विरोधी भूमिका घेतली. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझा प्रासंगिक करार झालाय. ज्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल, त्यादिवशी मी बाहेर पडेल, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षात असताना एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनीच मला इकडं आणलं. काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी लोकसभेची उमेदवारी कल्याण काळे यांना द्या, अशी मागणी मी केली. मात्र पक्षाच्या नेतृत्वानं तो सल्ला ऐकला नव्हता," असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

टोपी काढण्याचा जाहीर कार्यक्रम करणार : एकेकाळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार यांची भाषणबाजी चर्चेत राहायची. त्यात त्यांनी रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली. मात्र नंतर मित्र पक्षात आल्यानं आता अब्दुल सत्तार काय करणार अशी चर्चा रंगली. मात्र त्यावर बोलताना "आता विधानसभा निवडणुकीनंतर एक जाहीर कार्यक्रम घेऊन त्यात नवनियुक्त खासदार डॉ कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे यांना निमंत्रित करुन टोपी काढू," असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलं.

हेही वाचा :

  1. अजित पवारांचे आमदार करणार घरवापसी ? शरदचंद्र पवार गटाचा सावध पवित्रा, जयंत पाटलांनी केलं मोठ वक्तव्य - Lok Sabha Election Result 2024
  2. देवेंद्र फडणवीसांचं फडतूस राजकारण; एनडीएच्या खासदारांबाबत संजय राऊतांचा मोठा दावा - Sanjay Raut On Devendra Fadnavis
  3. कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार: निरंजन डावखरे भरणार अर्ज - Konkan Graduates Constituency 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.