नवी मुंबई Navi Mumbai News : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा होत आहे. 15 जूनपर्यंत मोरबे धरणात 26 टक्के पाणीपुरवठा शिल्लक होता. त्यामुळे नवी मुंबईत पाणी कपात करण्यात येत होती. मात्र, मुंबई आणि मुंबई लगतच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाची संततधारा सुरु असल्यामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरण चांगल्या प्रकारे भरले आहे. परिणामी नवी मुंबईतील पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
पुरेसा पाणीपुरवठा होत असल्यानं पाणी कपात रद्द : नवी महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात पावसाळी कालावधी सुरू होऊनही 15 जूनपर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये फक्त 26 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. धरणात पाणी पातळी खालावल्यानं २८ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे मुंबईतील आठही विभाग आठवड्यातून चार दिवस पाणी पुरवठा करताना संध्याकाळच्या पाणी पुरवठ्यात वाढीव कपात करण्यात आलेली होती. मात्र, सध्या पुरेसा पाणीपुरवठा झाल्यानं पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.
जुलै महिन्यात चांगली पर्जन्यवृष्टी : मोरबे धरण परिसरात सध्या जुलै महिन्यात चांगल्या प्रकारे पर्जन्यवृष्टी होत असून 26 जुलैपर्यंत मोरबे धरण क्षेत्रामध्ये एकूण 2407 मिमी इतका पाऊस झालेला आहे. यामुळे मोरबे धरणामध्ये एकूण 74 टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. 15 जूनपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात केलेली पाणी कपात रद्द करण्यात येत आहे. परंतु धरण चांगलं भरल्यामुळे २९ जुलैपासून पाणी पुरवठा नियमीतपणे सुरु राहील, असं महापालिकेच्या माध्यमातून सूचित करण्यात आलं आहे. नवी मुंबईकरांनी पाणी कपातीच्या कालावधीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आभार व्यक्त केले.
हेही वाचा
- मुसळधार पावसाचा जोरदार फटका; गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, महामार्गावरील लॉंच सेवा बंद - Weather update Mumbai
- मायानगरी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला ऑरेंज तर ठाण्यात येलो अलर्ट जारी - IMD Issues Orange Alert
- मुंबईला ऑरेंज अलर्ट : राज्यात 'या' ठिकाणी आज मुसळधार पावसाची शक्यता - Orange Alert To Mumbai