ETV Bharat / state

सलमान खानला धमकी देणाऱ्याची टरकली; माफी मागत म्हणाला.... - SALMAN KHAN THREAT MESSAGE

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर काही दिवसांपूर्वी धमकीचा मेसेज आला होता. अभिनेता सलमान खानला या मेसेजद्वारे धमकी देण्यात आली होती.

Salman Khan Lawrence Bishnoi
लॉरेन्स बिश्नोई, सलमान खान (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 9:11 PM IST

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज काही दिवसांपूर्वी आला होता. त्यात अभिनेता सलमान खानकडं ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर त्याच नंबरवरुन मेसेज आलाय. धमकी दिल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीनं माफी मागितल्याचा या मेसेजमध्ये उल्लेख आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सलमान खानला काय दिली होती धमकी : "हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचं असेल तर 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल," अशा पद्धतीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला होता.

धमकी देणाऱ्यानं मागितली माफी : मुंबई वाहतूक पोलिसांना पुन्हा याच व्हॉट्सॲप नंबरवरून आणखी एक मेसेज आला. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं माफी मागितली आहे. हा मेसेज चुकून पाठवण्यात आल्याचं मेसेज पाठवणाऱ्यानं सांगितलं. त्याबद्दल त्यानं माफी मागितली. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं झारखंडमधील ठिकाण पोलिसांना सापडलं आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे असल्यानं बिश्नोई गँगनं त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. खबरदारी म्हणून अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेतही मुंबई पोलिसांनी वाढ केली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा -

  1. कडक सुरक्षेत 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचला सलमान खान, जड अंतःकरणाने म्हणाला, 'मुझे आज आना ही नहीं था'
  2. "त्यानं आजपर्यंत कधी झुरळही मारलं नाही" : सलीम खाननं केली सलमानची पाठराखण
  3. सलमान खानचा शत्रू लॉरेन्स बिश्नोईवर बनणार वेब सिरीज, शीर्षकही ठरलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.