मुंबई Mumbai Rain : राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटे पासूनच तासा-तासानं विश्रांती घेत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
🗓️ १३ जुलै २०२४
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 13, 2024
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल;तर काही ठिकाणी अती जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
ओहोटी -सकाळी - ०९:४२ वाजता - २.१० मीटर
🌊 भरती - सायंकाळी - ०४:३९ वाजता - ३.६९ मीटर
ओहोटी - रात्री - ११:०५ वाजता - १.६६ मीटर…
पावसाचा वाढला जोर : पहाटे पासूनच मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी टप्प्याटप्प्यानं विश्रांती घेत जोरदार पाऊस कोसळत आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे लोकल वाहतुकीवर पावसाचा परिणाम झाला असून पाच ते दहा मिनिटं उशिरानं लोकल धावत आहेत. चाकरमान्यांची कामावर जाताना मात्र तारांबळ उडाली आहे. मुंबईतील दादर, परेल, हिंदमाता, चर्चगेट, सीएसटी परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबई उपनगरात देखील पावसाचा जोर वाढला असून अंधेरी, वांद्रे, सांताक्रुज, मालाड, बोरिवली परिसरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी येथील भुयारी मार्ग बंद करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
ऑरेंज अलर्ट जारी : शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकण रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा
- मायानगरी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला ऑरेंज तर ठाण्यात येलो अलर्ट जारी - IMD Issues Orange Alert
- घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल - Ghatkopar Hoarding Accident
- मुंबई महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांनी डावलले सभागृहाचे आदेश; अध्यक्षांनी उगारला कारवाईचा 'बडगा' - Maharashtra Mosoon Session 2024