ETV Bharat / state

पावसाच्या जोरदार बॅटींगमुळं बीएमसी प्रशासन 'आऊट'; पुन्हा एकदा मुंबईची 'तुंबई' - mumbai rain - MUMBAI RAIN

Mumbai Rain Update : रविवारी सकाळपासूनच मुंबई तसंच मध्य आणि पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळं पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली आहे. पावसाचा फटका हा रस्ता आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

Mumbai Rain
मुसळधार पावसानं झाडं कोसळलं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 3:40 PM IST

Updated : Jul 21, 2024, 4:21 PM IST

मुंबई Mumbai Rain Update : रविवारी सकाळपासूनच मुंबई तसंच मध्य आणि पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईतील दादर, प्रभादेवी, हिंदमाता, सांताक्रुज, अंधेरी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं आहे. तर पाणी साचल्यामुळं पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून, साचलेल्या पाण्यातून वाहनधारकांना वाट काढणं अवघड होत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस (ETV Bharat Reporter)

मुंबई उपनगरात ऑरेंज अलर्ट : दरम्यान, मुंबईत मागील दोन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याचा परिणाम रस्ते वाहतूक तसंच रेल्वे वाहतुकीवर होत आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरा सुरु आहे. आज रविवारची चाकरमान्यांना जरी सुट्टी असली तरी फिरण्यासाठी आणि कामासाठी अनेक मुंबईकर रविवारी सकाळी बाहेर पडत असतात. परंतु बाहेर गेल्यानंतर वाहतूक कोंडींचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय. तर सातारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय. तसंच यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, नांदेड आणि पुणे जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

झाड कोसळण्याची दुर्घटना : एकीकडं मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असताना, दुसरीकडे झाड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईतील सातरस्ता येथील जेकब सर्कल इथं पोस्ट ऑफिसच्या बाजूला भलं मोठं झाड कोसळलं आहे. यात दोन-चार गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडं पालिका प्रशासनानं मुंबईत पाणी साचणार नाही असा जो दावा केला होता, तो मुसळधार पावसामध्ये फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना : दरम्यान, अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाने आणि बचाव पथकांनी नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासह प्रशासनाने सतर्क राहावे आणि हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी. त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

  1. राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट - Maharashtra Weather Update
  2. सातारा जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'; कोयना धरणातील पाणीसाठा 'पन्नाशी' पार - Red Alert For Rain In Satara

Last Updated : Jul 21, 2024, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.