मुंबई Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईसह उपनगरामध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली. यामुळे शनिवारी पहाटे कामावर निघालेल्या चाकरमन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळं रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
🗓️ २० जुलै २०२४
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 20, 2024
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती - सकाळी - ११:२८ वाजता - ४.२४ मीटर
ओहोटी - दुपारी - ०५:३३ वाजता - २.०२ मीटर
🌊 भरती - रात्री - ११:१८ वाजता - ३.६६ मीटर
ओहोटी - (उद्या -…
मालाड, अंधेरी सबवे बंद : रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई सह उपनगरात अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलेलं असून याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुंबईमध्ये तीन दिवस हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन असणारी मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं तर पश्चिम रेल्वे 10 ते 12 मिनिटे उशिरानं धावत आहे. त्याचप्रमाणं हार्बर लाइन सुद्धा 15 ते 20 मिनिटे उशिरानं धावत आहे. या कारणानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. मिलन सबवे तसेच अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे. मालाड गोरेगावमधील बेस्ट बसचे मार्ग सुद्धा बदलण्यात आले असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसून येत आहे.
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी : विशेष म्हणजे पावसाचा जोर सतत वाढत असून या कारणानं आज दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण मुंबईमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं मलबार हिल परिसरामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं आज आणि उद्याही मुंबईसह उपनगरामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानं नागरिकांना सुद्धा सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा