ETV Bharat / state

हार्बर मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरली, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल सेवा ठप्प - Mumbai Local - MUMBAI LOCAL

Local Train Derail : सीएसएमटी रेल्वे स्थानकाम्यान लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरुन घसरल्यानं लोकल सेवा ठप्प झालीय.

Local Train Derail
हार्बर मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरली, पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी लोकल सेवा ठप्प
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 12:55 PM IST

Updated : Apr 29, 2024, 1:30 PM IST

हार्बर मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून घसरली

मुंबई Local Train Derail : सीएसएमटी रेल्वे स्थानकाम्यान लोकलचा एक डबा रेल्वे रुळावरुन घसरल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळं सीएसएमटीकडे जाणारी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालीय. त्यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. मुंबईकरांच्या कामावर जाण्याच्या वेळेतच मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं सर्व स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालीय.

एक डबा रुळावरुन घसरला : मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11:35 वाजताच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्लँटफार्म क्रमांक 2 वर प्रवेश करत असताना लोकलच्या एक डबा रुळावरुन घसरला. यामुळं डब्यात बसलेल्या प्रवाशाना जोरदार झटका बसला. त्यामुळं काहीकाळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण चालकानं नियंत्रण मिळवत लोकल ट्रेन थांबवण्यात यश मिळवलं. लोकल थांबताच प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या घेतल्या. रेल्वे रुळावरुन चालत प्रवाशी सीएसएमटी स्थानक गाठत असल्याचं चित्र दिसून आलं. मात्र, या घटनेत कुठल्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

लोकल सेवा ठप्प : दरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा स्थगित करण्यात आल्याची घोषणा रेल्वेनं केलीय. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झालंय. रेल्वे रुळावरुन घसरलेला लोकल ट्रेनचा डबा उचलून रेल्वे रुळावर आण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न काम सुरु केलंय. या घटनेमुळं सीएसएमटी ते पनवेल दरम्यानच्या लोकल सेवा ठप्प झालीय. सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवा एका मागं एक उभ्या असल्यानं प्रवासी लोकल डब्यात अडकून पडले आहेत. आठवड्याच्या पाहिल्याच दिवशी लोकल रेल्वे रुळावरुन घसरल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले असून रेल्वेच्या कारभारवार प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीय.

हेही वाचा :

  1. रेल्वेनं चालवली 'हत्या-एर्नाकुलम एक्सप्रेस', फोटो व्हायरल झाल्यानंतर गुगलवर फोडलं खापर - Hatia Ernakulam Express
  2. Sabarmati Express Accident : अजमेरजवळ रेल्वेचा भीषण अपघात; रेल्वे स्थानकावर उभ्या मालगाडीला धडकली साबरमती एक्सप्रेस
  3. कहरच! चक्क ड्रायव्हरविना धावली रेल्वे गाडी, कठुआ रेल्वे स्थानकातील प्रकार

Last Updated : Apr 29, 2024, 1:30 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.