ETV Bharat / state

मुंबईत पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू - Mumbai Hit and Run - MUMBAI HIT AND RUN

Goregaon Hit and Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रनची भीषण घटना घडली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात ही घटना घडली असून एका भरधाव कारच्या धडकेत 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय.

mumbai hit and run case speeding car kills 24 year old man at goregaon
गोरेगाव हिट अँड रन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 10:22 PM IST

Updated : Aug 29, 2024, 10:45 PM IST

मुंबई Goregaon Hit and Run : वरळी आणि पुण्यात हिट अँड रनची घटना ताजी असतानाच मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात एका भरधाव कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. दरम्यान, या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात : मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात एका भरधाव कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, वनराई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं तीन जणांना ताब्यात घेतलं असून, त्यापैकी एकजण अल्पवयीन आहे. वनराई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (29 ऑगस्ट) सकाळी भरधाव वेगात आलेल्या कारनं 24 वर्षीय दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नवीन वैष्णव असं मृत तरुणाचं नाव आहे.

अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात : वनराई पोलिसांनी सांगितलं की, सदरील कार पोलिसांनी जप्त केली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. वनराई पोलिसांतर्गत एका दूध विक्रेत्याला स्कॉर्पिओ चालकानं धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अपघातातील मृत नवीन वैष्णव हा राजस्थानचा रहिवासी होता. गुरुवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास आरे येथे ही घटना घडली. स्कॉर्पिओमध्ये दोन मुलं आणि दोन मुली असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट, मिहीर शाहचा अल्कोहोल रिपोर्ट आला निगेटिव्ह - Worli hit and run case
  2. जळगाव 'हिट अँड रन'; भरधाव कारची महिला आणि बाईकला धडक, पाहा थरारक सीसीटीव्ही - Jalgaon Hit and Run Case CCTV
  3. मुंबईत पुन्हा हिट अँड रन! वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून जीप गेल्यानं एकाचा मृत्यू - Hit and run on Versova

Last Updated : Aug 29, 2024, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.