मुंबई Jogeshwari Crime News : आपण अनेकवेळा असं ऐकलं की आपल्या मुलासाठी आई स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकते. बऱ्याचदा अशा घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, आता जोगेश्वरीमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. पहिल्या नवर्यापासून झालेल्या मुलावर राग असल्यानं तसेच प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्यानं सावत्र बापानं आणि आईनं चिमुकल्या मुलाची निर्घृण हत्या केलीय. राजेश चैतन्य राणा (वय 28 वर्ष) आणि त्याची पत्नी रिंकी राजेश राणा अशी आरोपीची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय? : 21 मे रोजी सायंकाळी सात ते रात्री साडेदहाच्या मुलाची हत्या झाली. मुंबई शहरातील जोगेश्वरी परिसरात आरोपी महिला रिंकी आणि तिचा प्रियकर राजेश हे चिमुकल्यासोबत राहत होतं. हा मुलगा हा रिंकीच्या पहिल्या पतीपासून झाला होता. राजेश हा रिंकीचा दुसरा नवरा होता. राजेश आणि रिंकी यांच्यात चिमुकल्यामुळं सतत भांडणं होत होती. त्यामुळं दोघांचाही चिमुकल्यावर राग होता. आपल्या तो अडचण ठरतोय असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे दोघांनी मिळून चिमुकल्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपींनी चिमुरड्याचा मृतदेह नाल्यात फेकला. त्यानंतर 21 मे रोजी आरोपींनी मेघवाडी पोलीस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
बापानं दिली कबुली: सावत्र बाप राजेशनं गुंगीचं औषध देऊन मुलाचं अपहरण झाल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस मुलाच्या शोधकार्यास लागले. पोलिसांनी अनेक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरुन पोलिसांना राजेश आणि रिंकी खोटी माहीती दिली असल्याचा संशय आला. पोलिसांनी रिंकी आणि राजेशला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता राजेशनं गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी राजेश आणि रिंकीला अटक करण्यात आलीय.
हेही वाचा
- पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
- पुण्यापाठोपाठ नागपुरातही मद्यधुंद चालकाचा 'कारनामा', भरधाव कारनं धडक दिल्यानं लहान मुलासह तिघे जखमी - nagpur accident
- डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने जणू 'मृत्युचे कारखाने', २०११ पासून ५५ दुर्घटनांमध्ये ५० पेक्षा जास्त बळी - dombiwali MIDC blast