मुंबई Mumbai Crime News : मालाडमधील मालवणी येथील हुसेन चौकाजवळ बुधवारी वाहन चोरीच्या संशयावरुन एका 25 वर्षीय मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या मजुराचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी इम्रान अन्सारी (26) याच्याविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करुन गुरुवारी त्याला अटक केली. मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिलीय.
नेमकं प्रकरण काय : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन जैस्वाल (25), तक्रारदार आकाश गायकवाड (32), पप्पू जैस्वाल आणि गुलशन पाठक हे मित्र होते. 10 एप्रिल रोजी रात्री सचिननं गायकवाड यांना मोबाईलवर फोन करुन चारकोप येथील साईधाम इथं बोलावलं. त्यानंतर सचिन गांजा खरेदी करण्यासाठी गेला होता. मात्र तब्बल 45 मिनिटे झाली तरी सचिन परतला नाही. सचिनचा शोध घेण्यासाठी गायकवाड गेला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर रात्री तो आपल्या वाहनाकडे परत आला असता गायकवाड यांनी गर्दी पहिली. सचिन रस्त्यावर बेशुद्ध पडलेला दिसला. गायकवाड यांनी सचिनला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यानं काही प्रतिसाद दिला नाही. यानंतर गायकवाड यांनी सचिनला रिक्षात बसवून चारकोप येथील रुग्णालयात आणले. तिथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीनं गायकवाड यांना माहिती दिली की, सचिननं इम्रान अन्सारी याची दुचाकी सुरु करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अन्सारी यानं सचिनला पाहून चोरीचा संशय घेतला. त्यामुळं त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, यात सचिन रस्त्यावर बेशुद्ध पडला.
आरोपीला अटक : याप्रकरणी गायकवाड यांनी 11 एप्रिल रोजी मालवणी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 320 (खून) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक केली. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितलं की, आम्ही आरोपी इम्रान अन्सारी (26) याला अटक केली आहे, तो चित्रकार असून मालवणी परिसरात राहतो. सचिन जैस्वाल हा चोर असल्याचा संशय आरोपीनं व्यक्त केला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गांजाच्या प्रभावानं तो पडून त्याच्या डोक्याला दुखापत झाली. सचिननं चुकून आरोपीची दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा :