ETV Bharat / state

महादेव बेटिंग प्रकरणात तिसऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेनं केली अटक - Mahadev Betting App Scam - MAHADEV BETTING APP SCAM

Mahadev Betting App Scam : महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यातील तिसऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे. भरत चौधरी असं आरोपीचं नाव असून त्याला न्यायालयानं पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महादेव बेटिंग ॲप
महादेव बेटिंग ॲप (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 3:15 PM IST

मुंबई Mahadev Betting App Scam : महादेव बेटिंग ॲप घोटाळ्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीनं भरत चौधरी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. हा या प्रकरणातील तिसरा आरोपी आहे. या प्रकणात न्यायालयानं भरत चौधरीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, भरत चौधरी हा दुबईत राहात होता. तो तिथूनच या प्रकरणातील आरोपींना ॲपशी संबंधित तांत्रिक मदत पुरवत होता.

दुबईतून करत होता मदत : महादेव ॲपसारख्या इतर ॲप्समध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक समस्यांचं विश्लेषण भरत करत असे. महादेव ॲप प्रमाणे इतर ॲप्समध्ये कोणतीही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाय शोधून आरोपींना मदत करत होता. भरत चौधरी हा या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी होता. म्हणून मुंबई गुन्हे शाखेनं त्याच्याविरुद्ध एलओसी जारी केली होती.

चौधरी मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात : भरत चौधरीविरोधात गुजरातमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुजरात पोलीस महादेव ॲपसारख्या काम करणाऱ्या काही ॲपविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. चौधरी हाही या प्रकरणातील वॉन्टेड आरोपी आहे. 23 जुलै रोजी गुजरात विमानतळावर उतरताच गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्या अटकेची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच मुंबई पोलीस त्यांची कोठडी संपण्याची वाट पाहात होते. गुजरात पोलीसांची कोठडी संपल्यानंतर भरत चौधरीला मुंबई गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं.

अभिनेता साहिल खानला अटक : 2023 मध्ये मुंबई पोलिसांच्या माटुंगा पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार बेटिंग ॲपविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. ज्यामध्ये तक्रारदारानं महादेव ॲपसह इतर ॲप्सच्या कामामुळं भारत सरकारचे 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणात 32 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. यानंतर मुंबई गुन्हे शाखेनं एसआयटी स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत दीक्षित कोठारी, अभिनेता साहिल खान या दोघांना अटक केलीय.

हे वाचलंत का :

  1. गुजरात पोलिसांना मोठं यश; महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यात एकाला अटक, 5200 कोटी रुपयांचा व्यवहार उघड - Mahadev Betting App Scam
  2. महादेव बेटिंग ॲपचं बीड कनेक्शन; आरोपींकडून 150 एटीएम कार्ड, 67 बँक पासबुक आणि एवढे सिमकार्ड जप्त - Mahadev Betting App Exposed
  3. बॉलिवूड अभिनेता साहिल खानला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी, काय आहे महादेव बेटिंग ॲप प्रकरण? - Mahadev Betting App Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.