ETV Bharat / state

BMC Budget 2024 : मुंबईचा तब्बल 60 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

BMC Budget 2024 : देशाचाल अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (2 फेब्रुवारी) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. दोन वर्षांपासून निवडणुका झाल्या नसल्यानं, या वर्षीही नगरसेवकांच्या अनुपस्थितीत प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर केलाय. जवळपास 60 हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर झालाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:44 AM IST

Updated : Feb 2, 2024, 12:26 PM IST

The budget of the BMC
देशाच्या आर्थिक राजधानीचा आज अर्थसंकल्प

मुंबई BMC Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आज (2 फेब्रुवारी) देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वर्ष 2024-25 चा हा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केलाय. यावर्षी देखील महानगरपालिकेचा अर्थसंकल्प नगरसेवकांच्या अनुपस्थितीत सादर झालाय. मागील दोन वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नसल्यानं, यावर्षीदेखील आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी अर्थसंकल्प सादर केलाय.

60 हजार कोटींचा अर्थसंकल्प : 'बीएमसी'नं 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 59,954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. 2023-24 चा अर्थसंकल्प हा 54,256.07 कोटी रुपये इतका होता. त्यामुळं मागील वर्षापेक्षा जवळपास 10.50% वाढ या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

वर्ष 2024-25 वर्षासाठी अर्थसंकल्प : मुंबई पालिकेच्या सहआयुक्त आणि प्रशासक अश्विनी भिडे यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याकडं सादर केलाय. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पी. वेलरसू यांनी एकूण अर्थसंकल्पीय अंदाज आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केलाय. जवळपास 60 हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय.

नगरसेवकांच्या अनुपस्थितीत सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प : पालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत सात मार्च 2022 रोजी संपली. त्यानंतर पालिकेत प्रशासकीय कारभाराला सुरुवात झाली. मागील दीड वर्ष इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसंच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष होतं.

मालमत्ता करात वाढ करण्याच्या प्रस्तावावर कारवाई नाही : कोरोनामुळे सन 2020-21 आणि सन 2021-22 या मागील दोन वर्षांच्या अर्थसंकल्पात पालिकेने कोणतीही करवाढ केली नव्हती. मात्र, आता नगरसेवकांच्या अनुपस्थितीत हा पालिकेचा दुसरा अर्थसंकल्प सादर होत असल्याने कोणते बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, मालमत्ता करात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सोबतच पालिका कचऱ्यावर देखील कर लावण्याच्या विचारात असून, त्यासाठी पालिकेच्या बायोलॉजमध्ये बदल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती आहे. सोबतच आगामी निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारच्या दबावाखाली पालिका फुगीर अर्थसंकल्प सादर करू शकते, अशा चर्चा देखील सध्या पालिकेत सुरू आहेत.

हेही वाचा :

1 केंद्रीय अर्थसंकल्पावरून राज्यात विरोधकांची मोदी सरकारवर जोरदार टीका, सत्ताधाऱ्यांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक

2 अर्थमंत्र्यांच्या 60 मिनिटांच्या भाषणानंतर देशात कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग?

3 अर्थसंकल्पावरुन कॉंग्रेस खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, 'आम्हाला दक्षिण भारत वेगळा देश करण्याची मागणी करावी लागेल'

Last Updated : Feb 2, 2024, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.