मुंबई Gold Seized On Mumbai Airport : मुंबई विमानतळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मागील तीन दिवसात 5.71 कोटी रुपयांचं 9.482 किलो सोनं जप्त केलंय. प्रवाशांच्या शरीरावर, गुदाशयात, प्रवाशांच्या हातातील सामानात आणि प्रवाशांनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांमध्ये खास डिझाइन केलेल्या पॅकेटमध्ये हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलंय. या प्रकरणांमध्ये आठ प्रवाशांना अटक करण्यात आल्याचं सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलं.
12 भारतीय नागरिकांची तपासणी : सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नैरोबी, अदीस अबाबा आणि पॅरिसमधून मुंबईला जाणाऱ्या परदेशी नागरिकांना थांबवण्यात आलं. त्यांच्याकडं अंडरगारमेंटमध्ये आणि शरीरावर लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने सापडले, ज्यांचं एकूण वजन 1681 ग्रॅम होते. विमानतळावर दुबई (04), अबुधाबी (03), जेद्दाह (02), बहरीन (01), कुवेत (01) आणि जकार्ता (01) येथून प्रवास करणाऱ्या 12 भारतीय नागरिकांना थांबवण्यात आलं आणि त्यांच्या गुदाशयात लपवलेलं 6627 ग्रॅम सोनं सापडलं. शरीर आणि अंतर्वस्त्रातही सोनं सापडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आठ जणांना अटक : या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आल्याचं मुंबई विमानतळ सेवा शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
मागील आठवड्यातही कारवाई : मागील आठवड्यातही सीमा शुल्क विभागाच्या पथकानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची झडती घेतली. या झडतीदरम्यान लपवून ठेवलेले 4.69 कोटी रुपये किमतीचे आठ किलो सोनं जप्त करण्यात आलं. याप्रकरणी विभागानं 11 आरोपी प्रवाशांना अटक केली. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॅकेट मेण, रेडियम प्लेटेड वायर, बकल्स आणि वॉशरच्या आकाराच्या अंगठ्यामध्ये सोनं लपवून ठेवलेल्या आरोपींना अटक केली. याशिवाय इतर वेगवेगळ्या कारवाईत एकूण 6.11 किलो सोनं, 20,000 डॉलर आणि मोबाईल जप्त करण्यात आले.
हेही वाचा :