ETV Bharat / state

मॉर्निंग वॉकला जाणं बेतलं जीवावर; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - मॉर्निंग वॉकला जाणं बेतलं जीवावर

Mumbai Accident : मुंबईतील लालबागजवळ सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव कारच्या धडकेत आपला जीव गमवावा लागलाय. याच घटनेत अन्य एक पादचारी जखमी झाल्याची घटना समोर आलीय.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा भरधाव कारनं धडक दिल्यानं मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 7:20 AM IST

Updated : Mar 1, 2024, 9:14 AM IST

मुंबई Mumbai Accident : लालबागजवळ पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या जोरदार धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. तर अन्य एक जण जखमी झाला. त्यानंतर अपघातासाठी जबाबदार असलेल्या कार चालकाला पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील कारचालक आरोपीला अटक केली असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

भरधाव कारची पादचाऱ्यांना धडक : या प्रकरणी विठ्ठल कदम यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार दिलीय. त्यांनी काळाचौकी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "ते आपले मित्र पांडुरंग मातारे यांच्यासह काळाचौकी येथील हुतात्मा भगतसिंग मैदानावर नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला जात होते. मात्र, 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत मैदानावर होणाऱ्या शासकीय कार्यक्रमामुळं त्यांना दैनंदिन चालण्यासाठी दुसरीकडं जावं लागलं आणि मार्ग बदलावा लागला. अपघाताच्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास कदम आणि मातारे हे दोघे पायी जात असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडनं परळच्या दिशेनं जात असताना परळहून भायखळ्याच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या एका वाहनानं त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यामुळं हे दोन्ही पादचारी जखमी झाले. काही वेळानं शुद्धीवर आल्यानंतर कदम यांना काही अंतरावर मातारे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. तर त्यांना धडकलेली कार अन्य वाहनावर आदळलेली दिसली."

रुग्णालयात मृत्यू : यानंतर जवळच्या लोकांनी त्वरीत पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच काळाचौकी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी मातारे यांना केईएम रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांच्या उपचाराला मातारे प्रतिसाद देत नव्हते आणि त्याच दिवशी त्यांचं निधन झालं. या अपघातात मातारे यांच्या डोक्याला खोलवर जखम झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

हेही वाचा :

  1. डोहाळ जेवण कार्यक्रम आटोपून परतताना पिकअपला भीषण अपघात; 14 जणांचा मृ्त्यू तर 20 गंभीर जखमी
  2. उत्तर प्रदेशात मोठा अपघात; पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, 7 लहान मुलांसह 15 जणांचा मृत्यू
  3. इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचं निधन, पाम बीचवर सायकलिंग करताना टॅक्सीनं दिली धडक

Last Updated : Mar 1, 2024, 9:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.