ETV Bharat / state

मेळघाटात खोल दरीत कोसळली बस; दोन महिलांचा मृत्यू, ५ जखमी - Bus Accident - BUS ACCIDENT

Bus Accident In Melghat : मेळघाटातील परतवाडा ते सेमाडोह मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस खोल दरीत (Bus Accident) कोसळली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाल्या आहे. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.

Bus Accident In Melghat
खोल दरीत बस कोसळली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 10:40 PM IST

अमरावती Bus Accident In Melghat : रोजगाराच्या निमित्तानं जिल्ह्यात आणि परराज्यात स्थलांतर केलेले आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणांत होळीच्या (Holi 2024) सणासाठी गावी येत आहेत. गेल्या चार दिवसापासून या गर्दीमध्ये वाढ झालीय. मेळघाटातील परतवाडा ते सेमाडोह दरम्यान एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्‍या अपघातात, दोन महिलांचा मृत्‍यू झालाय. ललिता चिमोटे, इंदू गंत्रे असे मृत्‍यू माहिलेची नावे आहेत. रविवारी सकाळी 11 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ही बस खाई मधून रात्री आठ वाजता तीन जेसीपीच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. या अपघातामुळं परतवाडा ते सेमाडोह मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. बसमध्ये एकूण 65 प्रवासी होते त्यातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

एक मृतदेह बसमध्ये तर दुसरा दरीत : परतवाडा कडून धारणीकडं जाणारी बस घाट वळणावर थेट दरीत जाऊन कोसळली. अपघात होताच एक महिला थेट बसच्या काचा तोडून बाहेर निघाली तर दुसरी चालकाच्या केबिनमध्ये जोरदार धडकून जागीच ठार झाली. ही बस बाहेर काढण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून तीन जेसीबीच्या साह्याने प्रयत्न करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता ही बस खाईतून बऱ्यापैकी वर आली असताना, एका महिलेचा मृतदेह बसच्या बाहेर खायच्या दिशेने लटकला होता. तर बस बाहेर काढत असताना बस बाहेर लटकलेल्या महिलेचा मृतदेह खाली दरीत कोसळला. रात्री आठ वाजता ही बस बाहेर काढण्यात आली. त्यावेळी एका महिलेचा मृतदेह बसमध्ये होता, तर दुसरा दरीमध्ये कोसळलेला होता. पोलिसांनी मृतदेह रात्रीच्या अंधारात बाहेर काढला.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त : दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असताना घटनास्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. जंगलामध्ये झालेली गर्दी पोलिसांनी नियंत्रित केली. थांबलेल्या वाहनांमधील अनेक जण उंच पहाडावर चढून नेमकं काय झालं हे पाहण्याचा प्रयत्न करीत होते, यावेळी पोलिसांनी त्यांना खाली उतरवलं. पोलीस उपनिरीक्षक अतुल नवगिरे यांच्यासह चार पोलीस निरीक्षक पदरा पोलीस आणि वीस होमगार्ड अपघात स्थळी तैनात होते.

दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प : दुपारी तीन वाजल्यापासून तीन जेसीबीच्या साह्यानं दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना, परतवाडा कडून धारणीकडं आणि धारणी कडून परतवण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळं दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

मदतीसाठी नवनीत राणा सरसावल्या : गेल्या दोन दिवसापासून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे होळी साजरी करण्यासाठी मेळघाटात आहेत. त्यांना अपघाताची माहिती मिळताच होळीचा कार्यक्रम अर्धवट सोडून त्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. अपघाग्रस्तांना तातडीनं मदतीचा हात मिळावा, यासाठी नवनीत रवी राणा यांनी घटनास्थळावर जावून बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत. जखमींना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेता यावं यासाठी खासदार नवनीत यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मदत कार्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर ग्रामस्थांचे सहकार्यानं मात करून त्या बसमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास प्रशासन सज्ज असल्याचं खासदार नवनीत रवी राणा यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. क्रिकेट सामना जिंकण्यापूर्वीच मृत्यूनं हरवलं; अमरावतीजवळील अपघातात चार तरुण क्रिकेटर जागीच ठार
  2. अनियंत्रित एनएमएमटी बसनं मोटारसायकलस्वारांना चिरडलं, घटना सीसीटीव्हीत कैद
  3. पालघर जिल्ह्यात बस आणि डंपरचा अपघात; दोघींचा मृत्यू, 15 प्रवासी गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.