मुंबई: खासदार उन्मेष पाटील म्हणाले, " मी केलेल्या विकासकामांची भाजपाला किंमत नाही. मी प्रमाणिकपण कामं केलं. काम करताना गट, तट, जात आणि धर्म मी पाहिलं नाही. मी बदल्याच्या आणि सूडाच्या राजकारणाला कंटाळलो. आमदार आणि खासदार होणं हे माझं उद्दिष्ट नव्हते. प्रामाणिक कार्यकर्त्यांची घुसमट होते. जे भाजपात सुरू, त्या पापाचे आम्ही धनी होता कामा नये. मानसन्मान नको. पण स्वाभिमानाने तरी जगता आले पाहिजे. कार्यकर्त्यांची अवहेलना होते. हे घातक आहे. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना वाढवू आणि मशाल पेटवणार आहोत. माझी कुठलीही अट नाही. खासदारकीच्या आशेनं मी आलो नाही."
खासदार संजय राऊत म्हणाले, "उन्मेष पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे शिवसेनेत स्वागत आहेत. उन्मेष पाटील हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवारही आणि पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत आहे. शिवसेना निष्ठावंतांची कदर करते."
उद्धव ठाकरे म्हणाले, " उन्मेष पाटील मी तुमचे स्वागत करतो. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. भाजपाची वापरा आणि फेकून द्याची वृत्ती आहे. तुम्हा प्रवाहाच्या विरोधात उडी मारली आहे. हा प्रवाह जनभावनेचा आहे. तुम्ही मोठे धाडस केले. आज माझ्याकडे काही नाही. जे होते त्यांनी गद्दारी करुन नेले. तुम्ही सत्ता आणण्यासाठी शिवसेनेत आलात. आपलं ध्येय एकच आहे, महाराजांचा अस्सल भगवा जळगावात फडकवायचा आहे. तुमच्यासारख्यांना भाजपाने वापरुन फेकून दिलंय. तुम्ही आज राज्याला दिशा दाखवून दिलंय. फसगत करणाऱ्यांना यापुढे निवडून द्यायचे नाही."
जळगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला
- जळगावमधून 2019 च्या लोकसभा उन्मेष पाटील यांना 7,13,874 मते मिळाली होती. राज्यातील लोकसभा निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. तर पहिल्या क्रमांकावर भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांना 7,06,678 मते मिळाली होती. योगायोगानं भाजपानं दोन्ही नेत्यांना तिकीट नाकारले नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे.
- उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची मंगळवारी भेट घेतली होती. ठाकरे गटाचे जळगावातील ज्येष्ठ नेते संजय सावंत यांनी नुकतेच सांगितले की, “उन्मेष पाटील यांची आज किंवा उद्या बातमी तुम्हाला मिळेल". जळगाव हा शिवसेनेचा (ठाकरे गट) बालेकिल्ला मानला जात होता. सध्या तेथील सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत
हेही वाचा-