ETV Bharat / state

नावारूपाला येणाऱ्या नेत्यांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा, खासदार उदयनराजेंचा खळबळजनक आरोप - MP Udayanraje Bhosale - MP UDAYANRAJE BHOSALE

MP Udayanraje Bhosale : साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले. पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची कॉंग्रेसची परंपरा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वाचा सविस्तर वृत्त...

MP Udayanraje Bhosale
खासदार उदयनराजे भोसले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 4:53 PM IST

सातारा MP Udayanraje Bhosale : राजेश पायलट, माधवराव शिंदे, वायएसआर रेड्डी या कॉंग्रेस नेत्यांच्या अपघाताच्या घटना विचार करायला लावणाऱ्या आहेत. पुरावेच नाही तर माणसंही गायब करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी केला आहे.

नेत्यांचा अपघाती मृत्यू योगायोग नाही : काँग्रेसमध्ये नावारूपाला येत असताना राजेश पायलट, माधवराव शिंदे, वाएसआर रेड्डी या नेत्यांचे झालेले अपघाती मृत्यू हा योगायोग म्हणता येणार नाही. या घटना विचार करायला लावणाऱ्या आहेत. ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांचं लिखित साहित्य काँग्रेसनं गायब केलं, त्याप्रमाणे माणसं पण गायब केली, असा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

यशवंतरावांना भारतरत्न देण्याची मागणी करणार : देशाचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे देशासाठीचे योगदान पाहता त्यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कराडमधील सभेत करणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितले.

यशवंतरावांच्या नावाचा निवडणुकीपुरता वापर : महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या. त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकारचे देशाच्या उभारणीचे मोठे योगदान राहिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी देखील परकीय आक्रमणाच्या काळात देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषवले. यशवंतराव चव्हाण यांचा विचार हा लोककल्याणाचा विचार आहे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला. पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत, असा आरोपही उदयनराजेंनी केला.

कॉंग्रेसने जनतेकडे दुर्लक्ष केलं : काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासनं देऊन खोऱ्यानं मतं मिळवली. मात्र, निवडून आल्यानंतर जनतेकडं साफ दुर्लक्ष केलं. याचा सर्वसामान्यांनी विचार करून देशाला प्रगती पथावर नेणाऱ्या भाजपा सरकारच्या हाती सत्ता देण्याचं, आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, गुढे येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

सत्तेत असताना धरणांची कामं का केली नाहीत? : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात बोलताना उदयनराजे म्हणाले की, "कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मी केली होती. त्यानुसार हे महामंडळ स्थापन झालं. ढेबेवाडी खोऱ्यात असलेलं मराठवाडी धरण याच कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालंय. काँग्रेसच्या नेत्यांकडं अनेक वर्षे सत्ता असताना अशी कामं त्यांनी का मार्गी लावली नाहीत?", असा संतप्त सवालही यावेळी उदयनराजेंनी केला.

हेही वाचा :

  1. आयपीएल सामन्यावर सट्टा; छत्तीसगडमधील तीन सट्टेबाज गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Betting on IPL Match
  2. नेत्यांच्या चकरा अन् हेलिकॉप्टरच्या घिरट्यांमध्ये वाढ; निवडणुकीच्या काळात आलाय भाव, किंमती जाणून बसेल धक्का - Lok Sabha election 2024
  3. अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल - Lok Sabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.