ETV Bharat / state

खासदार सुनेत्रा पवार का गेल्या मोदी बागेत? जाणून घ्या कारण - Sunetra Pawar In Modi Baug - SUNETRA PAWAR IN MODI BAUG

Sunetra Pawar In Modi Baug : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा ताफा मंगळवारी पुण्यातील मोदीबागेत दाखल झाल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर याविषयी पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली.

Sunetra Pawar And Sharad Pawar
सुनेत्रा पवार आणि शरद पवार (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 7:08 PM IST

मुंबई/पुणे Sunetra Pawar In Modi Baug : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनही गटात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला. मंगळवारी सकाळी खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदी बागेत (Modi Baugh) दाखल झाल्यानं राजकीय चर्चा सुरू झाल्या. त्यांनी कोणाची भेट घेतली, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

प्रतिक्रिया देताना प्रवक्ते सुरज चव्हाण (ETV Bharat Reporter)

सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची घेतली भेट? : खासदार सुनेत्रा पवार सकाळी मोदी बागेत दाखल झाल्या होत्या. दरम्यान, त्याचवेळी मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली का? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. तब्बल एक ते दीड तास सुनेत्रा पवार मोदी बागेत होत्या. त्यांनी नेमकी कोणाची भेट घेतली? या संदर्भात काही समजू शकलं नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होतीर. त्यावेळी देखील अनेक चर्चा रंगल्या. मात्र, ओबीसी आणि मराठा आरक्षणामुळं राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यासाठी आणि तोडगा काढण्याची विनंती शरद पवार यांना केल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण : खासदार सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत जाऊन नेमकी कोणाची भेट घेतली? यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. याविषयी पक्षाचे प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले की, "प्रसार माध्यमांकडून पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार या मोदी बागेत गेल्या, त्याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. मोदी बागेतील दुसऱ्या विंगमध्ये अजित पवार यांच्या भगिनी राहतात. त्यांची भेट घेण्यासाठी खासदार सुनेत्रा पवार गेल्या होत्या. माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे." सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेल्याचा पुन्हा एकदा स्पष्ट करत संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या थांबावाव्या, अशा प्रकारचं आवाहन सुरज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांना केलं.

हेही वाचा -

  1. छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर, भेटीचं कारण गुलदस्त्यात - CHHAGAN BHUJBAL MEETS SHARAD PAWAR
  2. "सरकारच्या विकासकामाला विरोधी आमदारांनीही मतं दिली"; निकालावर महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया - Vidhan Parishad Election Results
  3. खोके सरकारनं अर्थसंकल्पात दाखवलं गाजर : आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका - Aaditya Thackeray On budget

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.