पुणे MP Amol Kolhe : राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केलं आहे. समाज सर्व घटकांनी बनलेला असतो. सर्व समाजाच्या आशा-आकांक्षांचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं मी संसदेत जातिनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. तसंच जनगणना झाल्यास अनेक प्रश्न सुटतील, असा दावा कोल्हे यांनी केला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे : पुण्यातील टिळक स्मारक येथे शिवनेरीचे छावा या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. या निमित्तानं कोल्हे पुण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, मात्र ते मिळत असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असं माझं मत असल्याचं कोल्हे म्हणाले. जातनिहाय जनगणना केल्यास प्रश्न मार्गी लागतील, असं मला वाटतं. त्यामुळं आम्ही संसदेत आवाज उठवू अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली.
...तर त्यांचं स्वागत : "शिरूर लोकसभा निवडणुकीत जनतेनं माझ्यावर विश्वास व्यक्त केला. संसदेत मांडलेले विषय पुस्तक रुपात प्रकाशन होत आहे. अनेक नगरसेवक आज पक्षात प्रवेश करत आहेत, असं मी पण ऐकलंय. माझी त्यांच्याशी अजून भेट झालेली नाही. ज्यांनी मदत केली त्याचा विचार करुनच पक्षश्रेष्ठी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतील. अडचणीच्यावेळी मदत करणऱ्यांचं मत दुर्लक्षित करून चालणार नाही. पक्षात येणारे का सहभागी होताय, याचा विचार करूनच त्यांचं स्वागत करण्यात येईल", असं कोल्हे म्हणाले. "शिवनेरीची छावा' या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. त्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलाखतील अनेक गौप्यस्फोट ऐकायला मिळतील" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का :
- मुस्लिम समाजाची मतं चालतात, प्रतिनिधित्व देताना हात आखडता का? काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांचा सूर - Muslim Representation
- ...तर माझ्यावर हक्कभंग आणा; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आव्हान - Devendra Fadnavis News
- मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil