ETV Bharat / state

भंडाऱ्यातील प्रसाद भोवला; जेवणातून शंभरहून अधिक भाविकांना विषबाधा - Food Poison News - FOOD POISON NEWS

Food Poison News : नायगाव येथे शेतातील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या भंडारा कार्यक्रमात सुमारे 150 हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Food Poison
विषबाधा (Nanded Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 5:21 PM IST

प्रतिक्रिया देताना वैद्यकिय अधिकारी प्रशांत सोनकांबळे (Nanded Reporter)

नांदेड Food Poison News : नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे भंडारा कार्यक्रमात महाप्रसाद खाल्ल्यानं जवळपास 150 हून आधिक लोकांना विषबाधा झाली. लहान मुलांसह नागरिकांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, उपचार करण्यासाठी केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी असल्यानं, विषबाधा झालेल्या रुग्णांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय. ही गंभीर परिस्थिती पाहून स्थानिक डॉक्टरांनी उपचार करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली.

मळमळ, उलट्या, पोट दुखीचा त्रास : लालवंडी येथे महादेव मंदिरात भंडारा कार्यक्रम होता. या भंडाऱ्याच्या निमित्तानं गावाला निमंत्रण दिलं होतं. यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मात्र, सायंकाळच्या दरम्यान नागरिकांना मळमळ, उलट्या, पोट दुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळं नागरिकांना तातडीनं नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दीडशे नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला, रुग्णापेक्षा नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.

वैद्यकीय अधीक्षकासह अन्य अधिकारी गायब : नायगावच्या शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपरासाठी दाखल झाले होते. परंतु, केवळ दोनच वैद्यकीय अधिकारी उपचार करण्यासाठी उपलब्ध होते. वैद्यकीय अधीक्षकासह अन्य अधिकारी रुग्णालयात उपस्थित नव्हते. दाखल रुग्ण उपचारासाठी तळमळत होते. नातेवाईकांनी अन्य वैद्यकीय अधिकारी कुठे आहेत अशी विचरणा केली असता, कुणीही उत्तर दिलं नाही. उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी दोन आणि रुग्ण दीडशेच्यावर यामुळं अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं खासगी डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात जावून रुग्णांवर उपचार केला. या घटनेची माहिती मिळताच राजकीय नेत्यासह, सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जावून परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा -

  1. शोरमा खाल्ल्यानं तरुणाचा मृत्यू; 12 जणांना विषबाधा, पोलिसांनी 2 विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या - Mumbai Youth Died Eating Shawarma
  2. कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; शिकवणी वर्गात 500 विद्यार्थी घेत होते NEET, JEE ची शिकवणी - Students Suffer Food Poison
  3. Police Trainees Suffer Food Poison : धुळ्यात 70 प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा; रुग्णालयात केलं दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.