ठाणे Thane Crime News : ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawadi Police Station) जून २०१८ मध्ये दाखल विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यात मानलेल्या मामा असलेल्या ५६ वर्षीय विजय नारायण पटगार याला विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयानं आज शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला. तर तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बी. जाधव यांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर केले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी आरोपीस विनयभंग, जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरणी दोषी ठरवत २० वर्षाचा सश्रम कारावास आणि २० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
१६ वर्षीय मुलीचा विनयभंग : ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा विनयभंग आणि ठार मारण्याच्या धमकीबाबत गुन्हा दाखल झाला होता. हा खटला विशेष पॉक्सो न्यायालयात न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांच्या दालनात अंतिम सुनावणीसाठी आला होता. या प्रकरणात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद करत तपास अधिकारी पोलीस उपनिरक्षक अश्विनी जाधव यांनी दिलेले तत्सम पुरावे ग्राह्य धरून, आरोपी विजय नारायण पटगार याला दोषी ठरविण्यात आलं.
विनयभंग करून दिली जीवे मारण्याची धमकी : आरोपी पटगार हा पीडितेचा मानलेला मामा होता. घटनेच्या दिवशी पीडितेचे वडील दारू पिऊन आल्याची संधी साधून पीडितेचा विनयभंग करण्यात आला होता. तर ती ओरडल्याने तिचं तोंड दाबून अत्याचार केला होता. तसंच जीवे मारण्याची धमकी दिली होती. न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम २० हजार न भरल्यास २ वर्षे सश्रम शिक्षा भोगावी लागेल असं निकालात नमूद केलं आहे. सादर प्रकरणात सरकारी वकील रेखा हिवराळे, तपास अधिकारी अश्विनी जाधव, पोलीस हवालदार ईश्वर मनोरे, निलेश झेमणे, पोलीस हवालदार गावित यांनी मोलाचं सहकार्य केलं.
हेही वाचा -
- शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात महिला वकिलाचा विनयभंग, जिवे मारण्याचाही प्रयत्न; आरोपीला अटक - Woman Molesting In Mumbai
- रेल्वेत कॉलेज तरुणीचा विनयभंग; ट्रेन अटेंडंटला अटक, पीडिता पिकनिकसाठी आली होती मायानगरीत
- सहलीत विद्यार्थिंनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक, शालेय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची पालकांची मागणी