ETV Bharat / state

मुसळधार पावसात राज ठाकरे पुण्यात : नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी; रेड अलर्टमुळे नागरिक सतर्क, एकता नगरात साचलं पाणी - Raj Thackeray Visit Pune - RAJ THACKERAY VISIT PUNE

Raj Thackeray Visit Pune : हवामान विभागानं पुणे शहराला आज रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडं आज सकाळपासून पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र मुसळधार पावसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली.

Raj Thackeray Visit Pune
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 2:17 PM IST

Updated : Aug 4, 2024, 2:32 PM IST

मुसळधार पावसात राज ठाकरे पुण्यात (Reporter)

पुणे Raj Thackeray Visit Pune : पुणे शहरात तसेच घाट माथ्यावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. मागील आठवड्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीनं पुणे शहरातील अनेक भागात नागरिकांचं मोठं नुकसान झालं. सिंहगड रोड इथल्या एकता नगर परिसरात देखील पाणी साचल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. आज देखील पुणे शहरात हवामान विभागानं रेड अलर्ट दिला असून सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे एकता नगर परिसरात पुन्हा एकदा पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. मुसळधार पावसात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात धाव घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

पाणी साचलेल्या एकता नगरात राज ठाकरेंनी केली पाहणी : आज पुण्यातील सिंहगड रोड इथल्या एकता नगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, "मी काही दिवसांपूर्वी इथं येऊन गेलो आणि मार्ग काढू असं सांगितलं होतं. शनिवारी माझी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. यात मुळामुठा कॉरिडॉर संदर्भात चर्चा झाली. तसेच रिडेव्हलपमेंट बाबत देखील चर्चा झाली. मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे वाहनं पाण्याखाली गेली. यात ज्या कंपन्या इन्शुरन्स देत नाहीत, त्या संदर्भात महापालिका आयुक्त यांना सांगितलं आहे. लवकरात लवकर इन्शुरन्स भरून घ्या, तसंच संरक्षक भिंती बांधून घेण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. डेक्कन इथं विजेचा शॉक लागून 2 मुलं दगावली. त्यांना 10, 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या कुटुंबाला ते देतील. तसेच त्यांच्या भावाला सरकारी नोकरी लावण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. रिवर फ्रंटचे जे काम चालू आहे ते काम थांबवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

पुण्यात मुसळधार पाऊस : गेल्या एक ते दोन दिवसांपासून पुणे शहरात संततधार पाऊस सुरू आहे. आज हवामान विभागाकडून पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात 35000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलेलं आहे. यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ज्या भागात पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे., तिथं देखील प्रशासनाच्या वतीनं खबरदारी म्हणून विविध तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा :

  1. पुण्यात पुरसदृश परिस्थिती, सिंहगड रोड संपूर्ण पाण्यात; प्रशासनाच्या वतीनं बचावकार्य सुरू - Pune Rain Updates
  2. पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी; पाहा व्हिडिओ - Pune rain updates
  3. साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद - Heavy Rainfall in Maharashtra

Last Updated : Aug 4, 2024, 2:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.