ETV Bharat / state

आदित्य ठाकरेंच्या विरोधातही देणार उमेदवार; अत्याचार अगोदरही होते, निवडणूक आल्यानं विरोधक सरकारला बदनाम करताय का ?, राज ठाकरेंचा हल्लाबोल - Raj Thackeray Slams MVA Leaders - RAJ THACKERAY SLAMS MVA LEADERS

Raj Thackeray Slams MVA Leaders : महाविकास आघाडीच्या काळातही मोठ्या प्रमाणात महिला अत्याचारांच्या घटना घडल्या. मात्र आता निवडणूक जवळ आल्यामुळे विरोधक महाराष्ट्र बंद करण्याचा घाट घालत आहेत का, असा जोरदार हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांचाही खरपूस समाचार घेतला.

Raj Thackeray Slams MVA Leaders
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 12:56 PM IST

Updated : Aug 24, 2024, 5:20 PM IST

नागपूर Raj Thackeray Slams MVA Leaders : सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. मात्र हा प्रकार राज्यात थांबला पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा करण्याची गरज आहे. आता आंदोलन करणाऱ्यांच्या काळातही महिला अत्याचार होत होतेच. मात्र आता निवडणुका आल्या म्हणून विरोधक राजकारण करुन महाराष्ट्र बंदचं आंदोलन करतात का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (ETV Bharat Reporter)

दिवाळीनंतर लागतील विधानसभा निवडणुका : दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका लागतील, असं वाटतं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रेंगाळल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी वातावरण पोषक आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्याप्रमाणं मतदान झालं, तसंच आता होईल, असं नाही. महाविकास आघाडीला शरद पवार, उद्धव ठाकरे यांना झालेल्या मतदानाबाबत समजून घेण्याची गरज आहे. मुस्लिम समाजानं भाजपा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात मतदान झालं, असंही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही देणार उमेदवार : मागील वेळी राज ठाकरे यांच्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आदित्या ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी नागपुरात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही उमेदवार देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांचा राडा ; विधानसभेच्या उमेदवारीवरुन मनसेच्या दोन गटात तुफान हाणामारी - MNS Activist Dispute In Chandrapur
  2. "माझ्या नादी लागू नका, तुम्हीच खाक व्हाल..."; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Raj Thackeray Tweet
  3. माझी पोरं गाल, तोंड लाल करतील, तेव्हा कळेल- राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना इशारा - Raj Thackeray Slams Manoj Jarange

Last Updated : Aug 24, 2024, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.