ETV Bharat / state

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन, म्हणाले... - Raj Thackeray - RAJ THACKERAY

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे कार्यकर्ते मोठमोठे पुष्पगुच्छ घेऊन जातात. मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं असून हारतुरे आणू नका असं त्यांनी म्हटलंय.

राज ठाकरे
राज ठाकरे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 7:30 PM IST

मुंबई Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी 14 जून हा एक उत्सवाचा दिवस असतो. कारण, या दिवशी राज ठाकरे यांचा वाढदिवस असतो. राज ठाकरे यांचा वाढदिवस त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दरवर्षी एखाद्या उत्सवाप्रमाणं दादरच्या शिवाजी पार्क इथं साजरा करत असतात. शिवाजी पार्क येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दरवर्षी कार्यकर्त्यांची रेलचल असते. हार, पुष्पगुच्छ, केक, भेटवस्तू असं बरंच काही हे कार्यकर्ते आपल्या लाडक्या नेत्यासाठी घेऊन येत असतात. मात्र, यावर्षी राज ठाकरे यांनी कोणीही हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, मिठाई घेऊन येऊ नये, असं आवाहन केलंय.

राज्यभरातून येतात कार्यकर्ते : राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहे. राज ठाकरेंना मानणारा त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळं राज ठाकरे यांच्या एका आवाजावर मनसेचे कार्यकर्ते काहीही करण्यास तयार होतात. अशीच काहीशी परिस्थिती त्यांच्या वाढदिवसाला देखील असते. आपल्या नेत्यावरील प्रेमासाठी मनसेचे कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येत असतात. संपूर्ण दिवसभर रांगेत उभं राहून हे कार्यकर्ते, राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देता येतील या आशेवर असतात. त्यात काहींना शुभेच्छा देणं शक्य होतं तर काहींना शक्य होत नाही. यावर्षी मात्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसाठी विशेष वेळ राखून ठेवला असून कार्यकर्त्यांना या वेळेत शुभेच्छा देता येणार आहेत.

राज ठाकरेंची पोस्ट : वाढदिवसानिमित्त मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंसाठी मोठमोठे पुष्पगुच्छ आणि मिठाईचे डबे घेऊन जात असतात. यावेळी मात्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना एक भावनिक आवाहन केलं असून हारतुरे आणू नका असं त्यांनी म्हटलंय. त्यासंदर्भात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसाठी पोस्ट लिहिली असून ती मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलीय. सोबतच राज ठाकरे यांनी लिहिलेल्या सूचनेचं पालन करण्यात यावं असं मनसेकडून सांगण्यात येतंय.

काय लिहिलंय पोस्टमध्ये : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, दर वर्षी 14 जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येनं मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. पण यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे. सकाळी 8:00 ते 12:00 ह्या वेळेत मी उपस्थित असेन, तेंव्हा भेटूया 14 जूनला."

हेही वाचा :

  1. बाप तो बाप रहेगा...! राजकारणात पुन्हा एकदा शरद पवार पुतणे अजित पवारांवर वरचढ - Pawar vs Pawar
  2. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा मंत्र्यांकडे 'ही' खाती येण्याची शक्यता - Expected Portfolio for Maharashtra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.