ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले, मनसेचा हल्लाबोल - Mumbai University Senate Election

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Mumbai University Senate Election : 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक (Senate Election) पुढे ढकलण्यात आली आहे. तर, मुंबई विद्यापीठ परिसरात निवडणूक रद्दच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP) आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलय. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Mumbai University Senate Election
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक (संग्रहित छायाचित्र))

मुंबई Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची सिनेटची 22 सप्टेंबर (Senate Election) रोजी नियोजित निवडणूक होणार होती. मात्र, ही निवडणूक आता राज्य सरकारनं रद्द केली आहे. मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रद्द केल्यानंतर यावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दोनवेळा सिनेटची निवडणूक रद्द : मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक तोंडावर आली असताना आणि दोन दिवसावर निवडणूक येऊन ठेपली असताना, अचानक निवडणूक रद्दचा निर्णय कसा काय होऊ शकतो? यावर शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मागील तीन वर्षात दोनवेळा सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळं यावर शिवसेना (ठाकरे) गटानं कडाडून टीका केलीय.

भीतीमुळं निवडणूक रद्द : शिंदे गट आणि भाजपाला आपला पराभव समोर दिसत असल्यामुळच त्यांनी ही निवडणूक रद्द केलीय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई विद्यापीठ सिनेटमध्ये आपला जर पराभव झाला तर त्याचा मेसेज वेगळा जाईल आणि आपला पराभव होईल, या भीतीनं भाजपा आणि शिंदे गटानं ही निवडणूक रद्द केली असल्याचा गंभीर आरोप, शिवसेना (ठाकरे) युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केलाय.

अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक : दुसरीकडं मुंबई विद्यापीठात सध्या प्रशासक आहे. त्यामुळं प्रशासकावर कोणताच वचक राहिला नाही. प्रशासक मनमानी कारभार करत आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केलाय. त्यामुळं येथे लवकरात लवकर निवडणूक होणं अपेक्षित होतं. मात्र, ही नियोजित निवडणूक रद्द केल्यामुळं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुंबई विद्यापीठ परिसरात आंदोलन केलं. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले : मुंबई विद्यापीठाच्या परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. तर, दुसरीकडं मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक रद्द झाल्यामुळं मनसेनंही सडकून टीका केली आहे. 'मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे "रात्रीस खेळ चाले..." मुंबई विद्यापीठाचा अनागोंदी कारभार असल्याचा हल्लाबोल मनसे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे'.

28 उमेदवार रिंगणात : उद्या म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक होणार होती. दहा जागांसाठी ही निवडणूक होणार होती. यासाठी एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तर या निवडणुकीसाठी एकूण 13406 मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. मात्र, या निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारने मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक रद्द केल्यामुळं सरकारच्या या निर्णयावरून शंका उपस्थित करून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

म्हणून सरकार निवडणूक घेत नाही : 2018 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेनं सर्वच दहा जागा जिंकल्या होत्या. त्यामुळं आताही आम्हाला आमच्या सर्व जागांवर विजय होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण पराभवाच्या भीतीनं हे सरकार निवडणूक घेत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

हेही वाचा -

  1. Nitesh Rane On Senate Election : 'यासाठी' हव्यात सिनेट निवडणुका; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
  2. Mumbai University : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यामागे नक्की कोणते राजकारण? विद्यार्थी संघटना आक्रमक
  3. Mumbai University Election : सिनेट निवडणूक स्थगित; भाजपा आणि शिंदे गटाचा रडीचा डाव, विद्यार्थी संघटनांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.