ETV Bharat / state

राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर कार्यकर्त्यांचा राडा ; विधानसभेच्या उमेदवारीवरुन मनसेच्या दोन गटात तुफान हाणामारी - MNS Activist Dispute In Chandrapur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2024, 9:44 AM IST

Updated : Aug 23, 2024, 2:02 PM IST

MNS Activist Dispute In Chandrapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी चंद्रपुरात भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. मात्र राज ठाकरे यांनी सभेतून काढता पाय घेताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

MNS Activist Dispute In Chandrapur
मनसेच्या दोन गटात तुफान हाणामारी (Reporter)
विधानसभेच्या उमेदवारीवरुन मनसेच्या दोन गटात तुफान हाणामारी (Reporter)

चंद्रपूर MNS Activist Dispute In Chandrapur : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विधानसभेची उमेदवारी घोषित केली. मात्र या उमेदवारीवरुन मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे गट आमने-सामने आले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. राज ठाकरे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संतापलेल्या चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी ही हाणामारी सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी जाहीर केली उमेदवारी : मनसे प्रमुख राज ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असून गुरुवारी ते गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आणि संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. इथल्या एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक पदाधिकाऱ्यांशी प्रदीर्घपणे चर्चा केल्यानंतर नियोजित वेळेच्या तब्बल चार तासानंतर राज ठाकरे हे कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर उपस्थित झाले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मनसेचे उमेदवार म्हणून मनदीप रोडे तर राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी सचिन भोयर यांचं नाव घोषित करण्यात आलं. हे नाव घोषित केल्यानंतर राज ठाकरे आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी वणीकडं निघाले.

कार्यकर्त्यांच्या दोन गटात तुफान राडा : या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यामध्ये मनसेचे पदाधिकारी चंद्रप्रकाश बोरकर यांनी आक्षेप घेतला. सचिन भोयर हे मूळचे चंद्रपूर शहरातले असून ते स्थानिक नाहीत. राजुरा विधानसभा क्षेत्रात स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी बोरकर यांनी केली. आपल्यावर अन्याय झाला, अशी भावना त्यांच्यात होत असतानाच सचिन भोयर आणि बोरकर यांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचं रूपांतर तुंबळ हाणामारीमध्ये झालं. या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर लाथा बुक्क्यांचा मारा केला. मात्र काहींनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. राज ठाकरे यांच्या या बैठकीत पहिल्यांदाच असा राडा झाला. या हाणामारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

चंद्रप्रकाश बोरकर यांची मनसेतून हकालपट्टी : राज ठाकरे नुकतेच सभागृह सोडून गेल्यानंतर हा संपूर्ण राडा झाला. याची माहिती राज ठाकरे यांना मिळताच त्यांनी तत्काळ चंद्रप्रकाश बोरकर आणि त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर तो आदेश मान्य करुन त्याचं पालन करण्याऐवजी बोरकर यांनी राडा केला. त्यामुळे आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. "माझ्या नादी लागू नका, तुम्हीच खाक व्हाल..."; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Raj Thackeray Tweet
  2. जरांगेंच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण - राज ठाकरे यांचा गंभीर आरोप - Raj Thackeray
  3. माझी पोरं गाल, तोंड लाल करतील, तेव्हा कळेल- राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना इशारा - Raj Thackeray Slams Manoj Jarange

Last Updated : Aug 23, 2024, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.