पुणे Ravindra Dhangekar News : कल्याणी नगर येखील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मुद्यावरुन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या समोरच हप्तेखोरीची यादी वाचवून दाखवली. यानंतर चरणसिंग राजपूत यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ठ केलंय.
अधिकाऱ्यांची नावे दाखवली वाचून : आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं दर महिन्याला ७० ते ८० लाख रुपये हप्ता घेत असून, हप्ते घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची नावे देखील वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सागर सुर्वे, समीर पडवळ, तात्या शिंदे, स्वप्नील दरेकर, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ हे तुमच्या आशिवार्दाने हप्ते घेतात असा आरोप यावेळी धंगेकरांनी केला.
आरोपात कोणताही तथ्य नाही : याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत म्हणाले की, वर्षभरात बेकायदेशीर पब आणि बार वर 4 हजार हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यांनी परवानगी घेतली आहे अश्या पब आणि बारबाबत वेळेचे नियोजन, त्यांना घालून दिलेल्या नियम आणि अटी ते मान्य करतात का? याबाबत देखील पथकाद्वारे तपासणी करून कारवाई केली जाते. जे काही आरोप करण्यात आले आहेत त्यात कोणताही तथ्य नाही. जर असं काही असेल तर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी राजपूत यांनी सांगितल.
हेही वाचा -