ETV Bharat / state

"काश्मीरच्या लाल चौकात मोदी-शाहांमुळं..."; 'या' आमदाराचा काँग्रेसवर हल्लाबोल - Prakash Awade On Congress - PRAKASH AWADE ON CONGRESS

Prakash Awade On Congress : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (26 सप्टेंबर) कोल्हापूरला भेट दिली होती. यावेळी अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) आणि त्यांच्या पुत्रानं भाजपामध्ये प्रवेश केला. आता प्रकाश आवाडे यांनी थेट काँग्रेसवर घणाघात केला.

Narendra Modi and Amit Shah
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 6:23 PM IST

Updated : Sep 29, 2024, 6:39 PM IST

कोल्हापूर Prakash Awade On Congress : काँग्रेसच्या कार्यकाळात काश्मीरमधील लाल चौकात (Kashmir Lal Chowk) जायची कुणाची हिंमत नव्हती, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) कलम 370 आणि 35 ए हटवून काश्मिरात डौलानं तिरंगा फडकवला. मात्र, काँग्रेस हे स्वीकारायला तयार नाही. मोदी-शाहांच्या हिमतीनं झालेला हा बदल मनापासून आवडला म्हणूनच चार पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्यानंतर आता आम्ही भाजपात प्रवेश केलाय, असं म्हणत प्रकाश आवाडेंनी भाजपाचं कौतुक करत काँग्रेसवर टीका केली.

राहुल आवाडे निवडून येतील : "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीतून राहुल आवाडे राज्यात उच्चांकी मतांनी निवडून येतील," असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केलाय. इचलकरंजीत आयोजित भव्य हरिनाम पठण आणि दिंडी सोहळ्यानंतर आवाडे पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना आमदार प्रकाश आवाडे (ETV Bharat Reporter)

प्रकाश आवाडे यांचा पक्ष प्रवेश : चार दिवसांपूर्वी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भाजपात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल आवाडे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. गेली चार पिढ्या काँग्रेसवासी असलेले आवाडे कुटुंबीय आता महायुतीतील भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहे.

भाजपाकडून तयारी सुरू : इचलकरंजी परिसरातील जवाहर सहकारी साखर कारखाना, सहकारी बँका, गिरण्या अशा सहकारी संस्थांचं मोठं जाळं हे आवडे कुटुंबीयांची निवडणुकीत जमेची बाजू राहिली. यंदा मात्र राहुल आवाडे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी भाजपाकडून आतापासूनच तयारी सुरू झाली. तर राज्यात प्रचंड बहुमताने महायुती सरकारच सत्तेवर येणार, असा विश्वास इचलकरंजी विधानसभा महायुतीचे इच्छुक उमेदवार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला.

11 हजार टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिपाठ पठण : इचलकरंजीतल्या काळा मारुती मंडळाच्या वतीनं 'कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क' मैदानावर 11 हजार टाळ-मृदुंगाच्या गजरात अखंड हरिपाठ पठण आणि भव्य दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं, या सोहळ्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता, आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, मोश्मी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते घोरपडे नाट्यगृह मार्गावर विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषेत अबालवृद्ध सहभागी झाले होते. या सोहळ्यामुळं राज्याचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजीत प्रति पंढरपूरच अवतरल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

हेही वाचा -

  1. आगामी विधानसभा निवडणूक 2024 फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे, तर 'या' नेत्यांच्या नेतृत्वात लढवणार भाजपा - Assembly Election 2024
  2. अमित शाह यांची मोठी खेळी; विधानसभेच्या तोंडावर आवाडे पिता पुत्राचा भाजपामध्ये पक्षप्रवेश - Amit Shah Kolhapur Visit
  3. "महाराष्ट्राबाहेरील बाजारबुणग्यांनी आम्हाला खतम करण्याची भाषा करू नये", उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांना टोला - Uddhav Thackeray On Amit Shah

Last Updated : Sep 29, 2024, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.