ETV Bharat / state

आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा अपघातात संशयास्पद मृत्यू - MLA Daulat Daroda PA accident - MLA DAULAT DARODA PA ACCIDENT

MLA Daulat Daroda PA Accident : शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा पीएच्या अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रशांत भोईर असं त्यांच्या पीएचं नाव आहे.

MLA Daulat Daroda PA Accident
MLA Daulat Daroda PA Accident (Reporter Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 10:55 PM IST

Updated : May 6, 2024, 8:26 AM IST

ठाणे MLA Daulat Daroda PA Accident : अजित पवार गटाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या पीएचा संशयास्पद अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या स्वागत बार समोर घडली आहे. याप्रकरणी रवींद्र गणपत मडके (वय 38) यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रशांत सुरेश भोईर (वय, 30 रा. वाशिंद ) असं अपघातात ठार झालेल्या पीएचं नाव आहे.

अशी घडली घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार रवींद्र गणपत मडके हे शहापूर शहरातील चेरपोली येथील परांजपेनगरमध्ये कुटूंबासह राहतात. तर मृतक प्रशांत हे वांशिदमध्ये कुटूंबासह राहत असून शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे पीए म्हणून कार्यरत होते. त्यातच आज 5 मे रोजी मध्यरात्री तक्रारदार मडके हे तीन मित्रांसह नेहमीप्रमाणे कारमधून मुंबई नाशिक महामार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत लव्हली बारवर आले होते. त्यावेळी मृतक प्रशांत भोईल दोन मित्रांसह दुसऱ्या कारमधून तिथं आले होते. मात्र, प्रशांत भोईर ज्या कारमधून आले, त्या कारमध्ये ते नसल्याचं कारचालक मित्रानं तक्रारदारांना मोबाईलवर संपर्क करून सांगितलं प्रशांत आमच्या कारमध्ये नाही. तुम्ही येताना त्याला कारमधून घेऊन या. त्यामुळं मडके पुन्हा लव्हलीबारकडे आले. तेव्हा मुंबई नाशिक महामार्गावरील स्वागत बारसमोर प्रशांत गंभीर जखमी अवस्थेत त्यांना दिसला. ही घटना पाहताच दोन्ही कारमधील मित्रांनी जखमी प्रशांतला नजीकच्या खाजगी रुग्नालयात दाखल केलं. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं कार्डिओ रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यावेळी येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रशांत यांना तपासून मृत घोषित केलं. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद कोनगाव पोलीस ठाण्यात आज रवींद्र गणपत मडके यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. यावेळी अज्ञात वाहन चालकावर भादंवि कलम 304, (अ ) 279, 134(अ ) , 134(ब), 184 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय.

घटनेचा तपास सुरू : कोनगाव पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिवाय तांत्रिक बाबीचा आधार घेऊन तपास सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडं मुंबई नाशिक महामार्गावरील बियर बारसह डॉन्सबार रात्री उशिरापर्यत सुरू राहत असल्यानं महामार्गावर मोठ्या प्रमणात अपघात होत असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात तपास अधीकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दोडके यांच्याशी संपर्क साधला असता, अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं.

हे वचालंत का :

  1. हजारो प्रवासी घेऊन जाणाऱ्या रेल्वेचं इंजिन झालं वेगळे; तीन किलोमीटर पुढं गेल्यावर काय झालं? - Engine Detached From Running Train
  2. मसुरी अपघात : कार दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू, देहराडूनच्या महाविद्यालयात शिकत होते तरुण - Road Accident In Mussoorie
  3. माळशेज घाटात टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - Malshej Ghat Accident

Last Updated : May 6, 2024, 8:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.