ETV Bharat / state

अमोल मिटकरी तसंच मनसेतील वादामुळं राजकारण तापलं; मनसेचा पुन्हा मिटकरींना इशारा - MNS warning to Amol Mitkari - MNS WARNING TO AMOL MITKARI

Amol Mitkari : आमदार अमोल मिटकरी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील वादानं महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असून मनसेनं पुन्हा एकदा अमोल मिटकरींना इशारा दिला आहे.

Amol Mitkari
अमोल मिटकरी तसंच त्यांची फुटलेली गाडी (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 5:47 PM IST

Updated : Jul 31, 2024, 8:03 PM IST

मुंबई Amol Mitkari : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला साथ दिलीय. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीनं कामाला सुरुवात केलीय. मात्र, दुसरीकडं महायुतीतील पक्षात संभ्रम असल्याचं चित्र दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील वादामुळं महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

सुनिल तटकरे, योगेश चिले यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

मनसेचा स्वबळाचा नारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज्यात मनसे महायुतीचा घटकपक्ष असल्याचं त्यांचे नेते वारंवार सांगताय. मात्र, काही दिवसांपूर्वी पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यावरून विरोधकांनी मनसेवर टीका केली होती. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत राहणार की स्वबळावर लढणार याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

येथून पडली ठिणगी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार पुण्यात नसताना धरणं भरल्याचं त्यांनी विधान केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंगा आंदोलन करणाऱ्या तसंच सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये, असं जोरदार प्रत्युत्तर मनसेला दिलं होतं. त्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेत अकोल्यात त्यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं मनसे आणि राष्ट्रवादीमधील वाद टोकाला गेल्याचं बोललं जातय.

भ्याड हल्ला चुकीचा : यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेला हल्ला निंदनीय आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे अनेकवेळा नेत्यांची मिमिक्री करून टीका करतात. 'ती' त्यांची शैली आहे. मात्र, आशा प्रकारे पक्षानं राजकीय उत्तर दिल्यास भ्याड हल्ला करणं अत्यंत चूक आहे. असे प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नसल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

कर्णबाळा दुनबळेंना अटक करा : आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसंच या घटनेचा निषेध म्हणून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाभरात निदर्शनं करत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं लवकरात लवकर कर्णबाळा दुनबळेंना अटक करा, अन्यथा पुढील गोष्टीला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय.

बाजारू मिटकरी : अमोल मिटकरी यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर भ्याड हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यावर पुन्हा मनसे नेते योगेश चिले यांनी उत्तर दिलंय. अमोर मिटकरी यांच्यासमोर त्यांच्या कार्यालयात घुसून गाडी फोडली. त्यावेळी मिटकरी कार्यालयात लपून बसले. नेता कधीही कार्यकर्त्यांच्या पाठीमागं लपत नसतो, असा टोलाही चिले यांनी मिटकरींना लगावलाय. तसंच मनसेला संपवण्याची भाषा त्यांनी करू नये, असा जोरदार हल्ला त्यांनी मिटकरींवर केला.

'हे' वाचलंत का :

  1. आमदार अमोल मिटकरी यांची कार फोडणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू, पोलिसांकडून 50 जणांवर गुन्हा दाखल - Amol Mitkari Vs Raj Thackeray
  2. 'मनसे हा सुपारीबाज पक्ष...,' आदित्य ठाकरेंचा टोला - Aditya Thackeray Pune Visit
  3. "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism

Last Updated : Jul 31, 2024, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.