ETV Bharat / state

अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू; पतीला अटक, दहा जणांविरुद्ध गुन्हा - Palghar Crime News

Palghar Crime News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी (Mokhada Police) दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीच्या पतीला देखील अटक केली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 10:22 PM IST

Palghar Crime News
आदिवासी गरोदर विवाहितेचा मृत्यू (ETV BHARAT MH DESK)

पालघर Palghar Crime News : केंद्र आणि राज्य सरकारनं बालविवाह रोखण्यासाठी अनेक कायदे आणि उपाययोजना केल्या असल्या तरी, ग्रामीण भागात तसेच आजही आदिवासी भागात अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होण्याचं प्रमाण वाढत आहे. मोखाडा तालुक्यात अल्पवयीन आदिवासी विवाहितेचा गरोदरपणात मृत्यू झाल्यानं पुन्हा एकदा अल्पवयीन आदिवासी मुला-मुलींचे विवाह चर्चेत आले आहेत. या गंभीर प्रश्नाकडं शासन आणि प्रशासकीय यंत्रणेचं दुर्लक्ष होत असल्यामुळं असे विवाह होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

अल्पवयातील विवाहानं गरोदरपणात गुंतागुंत : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अशाच प्रकारे झालेल्या एका अल्पवयीन मुला-मुलीच्या विवाहातून मुलगी गरोदर राहिली आणि गरोदरपणातच या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता अल्पवयीन मुलीच्या पतीला अटक केली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केल्यामुळं पोलिसांनी मुलीचे आई-वडील, सासू-सासरे, लग्न लावणारे भटजी, मंडप डेकोरेटर अशा आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक अशा अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाह समारंभाला उपस्थित राहणाऱ्या सर्वच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे.

अल्पवयातील प्रेमसंबंधातून मुलगी गरोदर : मोखाडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणीचे जव्हार तालुक्यातील एका तरुणाशी सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान मुलगी गरोदर राहिली. तिच्या कुटुंबीयांनी गेल्या २९ मार्चला तिचे लग्न संबंधित तरुणासोबत लावले. लग्नाअगोदरच गरोदर असलेल्या या अल्पवयीन मुलीला सहा जून रोजी मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीमुळं तिचा मृत्यू झाला. त्यावेळी ती साधारण सहा महिन्याची गरोदर होती. याचा अर्थ चौदाव्या-पंधराव्या वर्षीच तिचे तरुणासोबत शारीरिक संबंध आले होते. सुरुवातीला तिच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. परंतु पोलिसांच्या तपासात हा विवाह बेकायदेशीर आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणारा असल्यामुळं पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात मुलगा-मुलगी, या दोघांचे पालक, मुलीचा मेहुणा, मंडप डेकोरेटर, पुजारी आणि लग्न सोहळ्याशी संबंधित असलेल्या दोघांचा समावेश आहे.

अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह : राज्यात बीडसह मराठवाड्यात तसेच पालघर, नंदुरबार, गडचिरोली आदी अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह होत असतात. ‘चाईल्डलाईन’ सारख्या संस्था अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह रोखण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असते. जनजागृतीची मोहीम राबवली जाते. परंतु, अजूनही सामान्यातल्या सामान्य घटकांपर्यंत ही जनजागृतीची मोहीम पोहोचलेली नाही, हे अल्पवयीन मुला-मुलींच्या विवाहाच्या वाढत्या संख्येवरून लक्षात येत आहे.

अल्पवयातील विवाह जीवावर बेतणारे : शासनानं विशेषतः महिला बालविकास विभागानं याबाबत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आदिवासी विभाग तसेच ग्रामीण भागात मात्र अजूनही अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह रोखण्यात आणि त्यासंबंधीची जनजागृती करण्यात यश आलं नाही. सरकारनं विवाह योग्य मुलाचे वय २१ आणि मुलींचे वय १८ केलं आहे. कायद्यानुसार या वयाच्या आत मुला-मुलींची लग्न करणं हा जसा गुन्हा आहे, तसाच तो मोठा सामाजिक अपराधही आहे. त्याचं कारण अठरा वर्षाच्या आत मुलींचे विवाह केले तर होणाऱ्या गर्भधारणेसाठी मुलींच्या शरीराची रचना तेवढी विकसित झालेली नसते. त्यामुळं मुलींचे कुपोषण तसेच जन्माला येणारे बाळही कुपोषित असते. अनेकदा प्रसूतीमध्ये अडचणी येऊन अल्पवयीन मुली किंवा बाळ दगावण्याचं प्रमाण जास्त असतं.

कायदा कडक, परंतु अंमलबजावणीवर साशंकता : अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह होणार नाहीत, यासाठी सरकारनं पुरोहित, मंगल कार्यालय चालक, पत्रिका छापणारे तसेच अन्य संबंधित घटकांवर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांनी या जबाबदारीचं उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातात. असं असतानाही अल्पवयीन मुला-मुलींचे विवाह मात्र थांबत नाहीत. मुला-मुलीच्या जन्मातारखेचा दाखला असल्याशिवाय पत्रिका छापणे, मंगल कार्यालय देणे, पुरोहितांनी पौरोहित्य स्वीकारणे, केटरर्सने ऑर्डर घेणे गुन्हा आहे. असे विवाह केवळ या घटकांच्या हलगर्जीपणामुळं होतात.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता : या सर्वांवर बलात्कारासह पोक्सो कायद्याच्या कलम ४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ च्या कलम ९,१० आणि ११ नुसारदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन विवाहितेच्या पतीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली आहे.

गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज : पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची मोहीम हाती घेतली असली, तरी अद्यापही या परिसरात चोरुन लपून बालविवाह होण्याचं प्रमाण जास्त आहेत. अल्पवयीन जोडप्याचा शारीरिक विकास होत नसल्यामुळं त्यांची मुले अनेकदा कमी वजनाची तसेच कुपोषित जन्मतात. ही या परिसरातील आदिवासी समाजातील मुलांच्या आरोग्याची एक मोठी समस्या आहे. या समस्येकडं शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा -

  1. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार; नराधमाला आठ वर्षांनंतर २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Convict in rape gets 20 years
  2. जळगावच्या जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; आरोपी फरार - Minor girl raped and killed
  3. धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पाजली बियर अन् केला बलात्कार - Minor Girl Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.