ETV Bharat / state

आई आणि मांत्रिकाच्या त्रासाने कंटाळलेली वाशिम जिल्ह्यातील युवती पोहोचली अमरावतीला - Ordeal Of Minor Girl

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 10:46 PM IST

Ordeal Of Minor Girl : गुप्तधन मिळवण्यासाठी एका मांत्रिकाच्या माध्यमातून सख्खी आईच आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार एका अल्पवयीन युवतीने केली आहे. यासाठी तिने मंगरूळपीर तालुक्यातून रविवारी थेट अमरावती शहर गाठले. एका समाजसेविकेच्या माध्यमातून तिने या प्रकरणाचा खुलासा केला. या युवतीची रवानगी सध्या बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

Ordeal Of Minor Girl
मांत्रिकाकडून युवतीचा छळ (Reporter)
अल्पवयीन मुलीची व्यथा मांडताना समाजसेविका (Reporter)

अमरावती Ordeal Of Minor Girl : गुप्तधन मिळावे यासाठी आईकडून गत तीन वर्षांपासून एका मांत्रिकाच्या माध्यमातून आपला छळ केला जातो आहे असं सांगणारी पंधरा वर्षीय युवती वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातून रविवारी थेट अमरावतीत पोहोचली. यानंतर तिने समाजसेवी प्रीती साहू यांना मोबाईलवरून संपर्क साधून आपली सारी व्यथा सांगितली. त्यानंतर तिला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले.

गुप्तधनासाठी अघोरी प्रकार : युवतीची आई अंधश्रद्धाळू असल्यामुळे एका मांत्रिकाद्वारे आपल्या मुलीवर ती अघोरी विद्या करून गुप्तधन मिळेल या आशेने तीन वर्षांपासून युवतीला घरात रोज रिंगण करून भोंदू तांत्रिकाच्या माध्यमातून तिच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग करत होती. या अघोरी कृत्या दरम्यान तिला उपाशी ठेवले जायचे. हा सारा प्रकार असह्य झाल्यामुळे मी घर सोडून अमरावतीला पळून आले असे त्या युवतीने मला सांगितले असल्याची माहिती प्रीती साहू यांनी दिली. रविवारी अचानक त्या युवतीचा मला कॉल आला. तिला भेटायला मी मध्यवर्ती बस स्थानक येथे गेली. त्या मुलीला भेटल्यावर आणि तिची कहाणी ऐकल्यावर मला मोठा धक्काच बसला असे प्रीती साहू यांनी सांगितले.

युवती हरवल्याची पोलिसात तक्रार : सदर युवती ही 17 मे पासून हरवली असल्याची तक्रार तिच्या आईने मंगरूळपीर पोलीस ठाण्यात दिली होती. प्रीती साहू यांनी वाशिम जिल्ह्यातील काही ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून मंगरूळपीर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या युवतीचा फोटो प्रीती साहू यांना पाठविल्यावर ज्या मुलीची हरवल्याची तक्रार आहे ती मुलगी हीच असल्याचे निश्चित झाले. त्या युवतीला बालसुधार गृहात ठेवण्यात आले असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सध्या केली जात आहे.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना केली मदत; रस्त्यावर उतरून जखमींना पाठवलं रुग्णालयात - CM Shinde Helped Injured
  2. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा;उद्धव ठाकरेंचा आरोप, म्हणाले पहाटेचे 5 वाजले तरी मतदान करा - Lok Sabha Election 2024
  3. राज्यात शेवटच्या टप्प्याचं मतदान शांततेत; नवमतदारांचा मतदानासाठी उत्साह.. - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.