ETV Bharat / state

झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेलं अन् केला अत्याचार; पाच नराधम ताब्यात - JALNA MINOR GIRL RAPE

जालन्याच्या चंदनझिरा भागात चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल रात्री 8 वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेत काही नराधमांनी अत्याचार केला होता.

JALNA MINOR GIRL RAPE
जालन्यात चिमुकलीवर अत्याचार (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2024, 5:33 PM IST

Updated : Oct 14, 2024, 6:04 PM IST

जालना : राज्यात सातत्यानं मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जालन्यातील चंदनझिरा परिसरात एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी आता पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय.

उचलून नेत केला अत्याचार : काल (13 ऑक्टोबर) रात्री चंदनझिरा भागातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेत काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला होता. चिमुकलीची आई घरातील काही साहित्य आणण्यासाठी बाहेर गेली असताना घरात झोपलेल्या चिमुकलीस काही नराधमांनी बळजबरीनं उचलून नेत तिच्यावर अत्याचार केला. मुलीवर अत्याचार करून मारहाण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

जालन्यात 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार (Source - ETV Bharat Reporter)

5 संशयितांना घेतलं ताब्यात : या घटनेनंतर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, अत्याचाराच्या घटनेनंतर पीडितेला तातडीनं जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी तिला प्रथोपाचार देऊन पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथं पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली. पिडीतेची प्रकृती आता ठीक असून आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचंही अजय कुमार बंसल यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचाराची धमकी; हैदराबादवरून आलं पत्र
  2. बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या; 700 पोलिसांकडून तपास सुरू
  3. "वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर...", केंद्र सरकारचं नेमकं म्हणणं काय? - Marital Rape

Last Updated : Oct 14, 2024, 6:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.