ETV Bharat / state

चित्रपटगृहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करा; मंत्री उदय सामंतांचं आवाहन - ram mandir live ayodhya

Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये थेट प्रक्षेपण करण्याचं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चित्रपटगृह चालक, मालकांना केलीय. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.

Ram Mandir Pranapratistha Ceremony
उद्योगमंत्री उदय सामंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 5:48 PM IST

Updated : Jan 21, 2024, 5:54 PM IST

मुंबई Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. या ऐतिहासिक क्षणाची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत आहे. 22 जानेवारी हा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. त्यामुळं अनेक राज्य सरकारनं या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिराच्या सोहळ्याला राजकीय नेते, बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी अयोध्येत दाखल होत आहेत.

  • जय श्रीराम..
    २२ जानेवारी २०२४ हा रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृह चालक मालक यांना नम्र विनंती आहे की उद्या होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आपल्या चित्रपटगृहात करून आपण सुद्धा या उत्सवात सामील…

    — Uday Samant (@samant_uday) January 21, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चित्रपटगृहात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं प्रक्षेपण करा : 22 जानेवारीला चित्रपटाचं शूटिंग देखील बंद राहणार आहे. 22 जानेवारी 2024 'हा' रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृह मालकांनी सोमवारी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपल्या चित्रपटगृहात करून आपणसुद्धा या उत्सवात सामील व्हावं, असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

चित्रपटांचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. यावेळी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीनं देखील 22 जानेवारी म्हणजेच सोमवारी सर्व चित्रपटांचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून त्या दिवशी शूटिंग होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

कोणताही चित्रपट दाखवला जाणार नाही : 'एफडब्ल्यूआयसीई'चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी एका निवेदनाद्वारे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, 'आम्ही या विशेष प्रसंगी सुट्टी जाहीर करतोय. आमचे सर्व कामगार सुट्टीवर असल्यानं या दिवशी कोणताही चित्रपट दाखवला जाणार नाही.' तिवारी पुढे म्हणाले, 'आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा कोणाचं मोठे नुकसान होत असेल, तर अशा परिस्थितीत मदत करावी ही विनंती.'

थेट प्रक्षेपण पाहा चित्रपटगृहात : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त देशभरात जल्लोष, आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येला न जाताही देशवासीयांना त्यांच्या ठिकाणाहून हा सोहळा अनुभवता येणार आहे. त्यासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. अयोध्येतून थेट प्रक्षेपण 70 हून अधिक शहरांमधील 160 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये दाखवलं जाणार आहे. त्याचं शुल्कही निश्चित करण्यात आलं आहे. हे थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 100 रुपयांमध्ये पाहू शकता.

हे वाचलंत का :

  1. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब, विधी विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
  2. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी 'हे' सेलिब्रिटी झाले रवाना
  3. मूर्खांना उत्तर देत नाही; 'त्या' फोटोवरुन देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Last Updated : Jan 21, 2024, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.