ETV Bharat / state

महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार धनुष्यबाणावरच लढणार - उदय सामंत - Lok Sabha Elections 2024

Minister Uday Samant : महायुतीच्या जागा वाटपाचं गणित ठाणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जागांवर अडून राहिलं आहे. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी या जागेवर दावा ठोकला असला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवेल, असा ठाम प्रतिदावा मंत्री उदय सामंत यांनी केलाय.

Minister Uday Samant
उदय सामंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 6:46 PM IST

मुंबई Minister Uday Samant : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा आपला बालेकिल्ला असून या मतदारसंघातून आपल्याला तिकीट मिळालंच पाहिजे आणि आपणच उमेदवार असणार असा वारंवार दावा भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलाय. नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना आता पुन्हा एकदा वारं उलट्या दिशेने वाहू लागलय.

मेळावा रद्द करण्याची नामुष्की : नारायण राणे यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना पुन्हा एकदा उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबत हट्ट कायम ठेवलाय. ही उमेदवारी प्रतिष्ठेची केल्यानं भाजपाला हा मतदारसंघ सोडावा लागल्याची चर्चा आहे. नारायण राणे यांच्या वाढदिवशी भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतही राणे यांना स्थान मिळू शकलं नाही. तर गुढीपाडव्याच्या दिवशी रत्नागिरीत महायुतीने आयोजित केलेल्या मेळाव्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गट तसंच उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे हा मेळावाच रद्द करण्याची महायुतीवर नामुष्की ओढवली होती.

राणे आणि सामंत तणाव वाढला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी अखेर डाव साधला असून किरण सामंत यांनी उमेदवारी खेचून आणली आहे, अशीच चर्चा सुरू झालीय. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं, असं बोललं जातय. तर दुसरीकडे नारायण राणे मात्र माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. नारायण राणे यांनी जाहीरपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर दरम्यानच्या काळात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यामुळे अधिक चर्चा रंगू लागली आहे.

काय आहे सामंत यांचे स्टेटस : उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांनी आपलं स्टेटस ठेवलं असून यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या एका भाषणाची व्हिडिओ क्लिप ठेवली आहे. यामध्ये अजित पवार म्हणत आहेत की, जर मिठाचा खडा पडला तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही. अजित पवारांचा हा व्हिडिओ शेअर करत किरण सामंत यांनी धमकीवजा इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात धनुष्यबाणावरच उमेदवार : या संदर्भात बोलताना उद्योग मंत्री किरण सामंत म्हणाले की, "रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण आणि नाशिक या जागांवर महायुतीमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसात हा तिढा नक्की सुटेल; मात्र, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये धनुष्यबाण चिन्हावरच तुम्हाला उमेदवार दिसेल, असा दावा सामंत यांनी केला आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर मात्र शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी असा महायुतीचा एकत्र प्रचार वेगाने सुरू होईल. तोपर्यंत प्रत्येक जण आपल्या पक्षाचा प्रचार करेल."

हेही वाचा :

  1. . . .तेव्हाच राज ठाकरे यांची लाईन क्लिअर होती, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल - Supriya Sule On Raj Thackeray
  2. राजकारणातील चाणक्यानं फेकला शेवटचा पत्ता, धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला शरद पवार गटात करणार प्रवेश - loksabha election 2024
  3. कोर्ट आंधळे नाही; सुप्रीम कोर्टानं रामदेव, बाळकृष्ण यांना पुन्हा फटकारलं, माफीनामा नाकारला, जबर दंडाची शक्यता - Patanjali Fraud Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.